लातुरात दुकान फाेडले; अडीच लाख पळविले ! धाडसी चाेरी : शटरचे लाॅक ताेडून चाेरटे दुकानात शिरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 08:59 IST2026-02-24T08:58:25+5:302026-02-24T08:59:07+5:30

सोमवार, २३ फेब्रुवारी राेजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले असता, चोरी झाल्याचे समोर आले. चोरट्यांनी काउंटरमधील तब्बल २ लाख ५० हजारांची राेकड चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.

Shop broken into in Latur; Rs 2.5 lakh stolen! Daring thief: Thieves entered the shop by breaking the shutter lock | लातुरात दुकान फाेडले; अडीच लाख पळविले ! धाडसी चाेरी : शटरचे लाॅक ताेडून चाेरटे दुकानात शिरले

लातुरात दुकान फाेडले; अडीच लाख पळविले ! धाडसी चाेरी : शटरचे लाॅक ताेडून चाेरटे दुकानात शिरले

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील नवीन रेणापूर नाका ते जुना रेणापूर नाक्यादरम्यान असलेल्या पादत्राणांच्या एका नामांकित दुकानात धाडसी चोरी झाल्याची घटना साेमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून काउंटरमध्ये ठेवलेली २ लाख ५० हजारांची रोकड पळवली आहे. याबाबत शिवाजी नगर पोलिस ठाण्यात साेमवारी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले की, महेबूब नगर भागातील रहिवासी शमरोझ मुकीत शहरियर (वय ३२) यांचे पादत्राणांचे दुकान आहे. रविवार, २२ फेब्रुवारी राेजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, रात्रीच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे उजव्या बाजूचे लॉक तोडले आणि आत प्रवेश केला.

सोमवार, २३ फेब्रुवारी राेजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले असता, चोरी झाल्याचे समोर आले. चोरट्यांनी काउंटरमधील तब्बल २ लाख ५० हजारांची राेकड चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. या धाडसी चाेरीची माहिती मिळताच शिवाजी नगर ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

याबाबत शिवाजी नगर पाेलिस ठाण्यात शमरोझ शहरियर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरनं. ७६ / २०२६ बीएनएस कलम ३३१ (३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक जिरगे हे करीत आहेत.

वर्दळीच्या परिसरात चाेरी, व्यापाऱ्यांत उडाली खळबळ

लातुरात भरवस्तीत असलेल्या दुकानात अशा प्रकारे चोरी झाल्याने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता चाेरट्यांचा शोध घेत आहेत. या धाडसी चाेरीमुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत चाेरट्यांच्या टाेळ्या सक्रिय झाल्याचे समाेर आले आहे.

Web Title : लातूर में दुकान में सेंध; ढाई लाख की साहसिक चोरी!

Web Summary : लातूर में, रेनापुर नाका के पास एक जूते की दुकान में चोरों ने सेंध लगाई, काउंटर से ढाई लाख रुपये चुरा लिए। पुलिस साहसिक चोरी की जांच कर रही है, जिससे स्थानीय व्यवसायी चिंतित हैं। शिवाजी नगर पुलिस स्टेशन में मामला दर्ज।

Web Title : Latur Shop Broken Into; ₹2.5 Lakh Stolen in Daring Theft

Web Summary : In Latur, thieves broke into a shoe store near Renapur Naka, stealing ₹2.5 lakh from the counter. Police are investigating the daring theft, which has alarmed local businesses. A case has been registered at Shivaji Nagar Police Station.