धक्कादायक ! सतत रडते म्हणून पित्याने गळा दाबून केली चिमुकलीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 18:56 IST2019-08-02T18:52:53+5:302019-08-02T18:56:53+5:30

आरोपी पिता अन्य एका गुन्ह्यात जामिनावर आहे

Shocking! Father kills baby dut to her continued cry | धक्कादायक ! सतत रडते म्हणून पित्याने गळा दाबून केली चिमुकलीची हत्या

धक्कादायक ! सतत रडते म्हणून पित्याने गळा दाबून केली चिमुकलीची हत्या

शिरूर अनंतपाळ/ निटूर (जि़ लातूर) : मुलगी नेहमी रडते म्हणून एका निर्दयी पित्याने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून खून केल्याची घटना निटूर (ता. निलंगा) येथे घडली आहे. याप्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात शुक्रवारी पित्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

निलंगा तालुक्यातील निटूर येथील शिवाजी लाळे यांना श्रावणी नावाची एक वर्षाची मुलगी होती. ती नेहमी रडत असल्याने वडिल शिवाजी लाळे याने गुरुवारी सायंकाळी तिचा गळा दाबून खून केला़ याप्रकरणी मुलीची आई मुक्ता उर्फ सुरेखा शिवाजी लाळे यांच्या फिर्यादीवरुन पती शिवाजी लाळे याच्या विरोधात शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात कलम ३०२ भादंविनुसार शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी शिवाजी लाळे यास अटक केली आहे़ अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन इंद्राळे हे करीत आहेत. 

दरम्यान, शिवाजी लाळे हा अन्य एका गुन्ह्यात जामीनावर आहे़ त्याच्या पूर्वीच्या पत्नीने पेटवून घेतले होते. त्याप्रकरणात गुन्हा दाखल असल्याचे पोलीस पोहेकॉ सौदागर यांनी सांगितले.

Web Title: Shocking! Father kills baby dut to her continued cry