उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी शिवकुमार डिगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:23+5:302021-06-26T04:15:23+5:30

लातूरचे न्या. शिवकुमार डिगे यांनी सर्वसामान्य कुटुंबातून आपले शिक्षण पूर्ण केले. विधी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी ...

Shivkumar Dige as High Court Judge | उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी शिवकुमार डिगे

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी शिवकुमार डिगे

लातूरचे न्या. शिवकुमार डिगे यांनी सर्वसामान्य कुटुंबातून आपले शिक्षण पूर्ण केले. विधी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी ते सदैव आग्रही राहिले आहेत. तसेच कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यानंतर काही काळ लातूरच्या जिल्हा न्यायालयात वकिली केली. जिल्हा वकील मंडळाचे ते अध्यक्ष राहिले. दरम्यान, त्यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाली. सर्वप्रथम त्यांनी मुंबई येथे सिटी सिव्हील कोर्टात काम केले. त्यानंतर सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश म्हणून ते कार्यरत होते. तसेच पुणे येथे सहधर्मादाय आयुक्त म्हणून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. सार्वजनिक संस्थांमधील पारदर्शकता आणि विश्वस्त मंडळाची जबाबदारी दाखवून देणारे महत्वपूर्ण निकाल दिले. संस्था नोंदणीकरणातील विलंब दूर करणारा निर्णय अनेक विश्वस्त संस्थांसाठी पथदर्शी ठरला. त्यानंतर त्यांची रत्नागिरी येथे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. विशेष म्हणजे अलिकडच्या काळात राज्याचे धर्मादाय आयुक्त म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय गरजू रुग्णांना दिलासा देणारे ठरले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना विनामूल्य आरोग्य सेवा देणारे निर्णय देताना रुग्णालयांना नियमांवर मार्गक्रमण करावे लागले. प्रसंगी स्वत: रुग्णाचे वेशांतर करून संबंधित विश्वस्त रुग्णालयांना जबाबदारीची जाणीव करून दिली. मोठ्या सार्वजनिक संस्थांमधील तंटे सोडविणारे निर्णय दिले. तद्‌नंतर त्यांची उच्च न्यायालयात प्रबंधक म्हणून नियुक्ती झाली. तसेच काही काळ विधी सेवा प्राधिकरणाचे राज्याचे सचिव म्हणून काम करताना गरजूंना विनामूल्य कायद्याची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभर उपक्रम राबविले. सध्या ते मुंबई उच्च न्यायालयात मुख्य प्रबंधक म्हणून कार्यरत होते.

फोटो कॅप्शन :

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदाची शपथ घेताना न्या. शिवकुमार डिगे.

फोटो फाईल नेम :

२५एलएचएचपी शिवकुमार डिगे.टीफ

Web Title: Shivkumar Dige as High Court Judge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.