पालिका निवडणुकीत शिवसेना विशेष अस्तित्व निर्माण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:14 IST2021-07-03T04:14:06+5:302021-07-03T04:14:06+5:30
येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी माने म्हणाले, शहर व तालुक्यातील शिवसेनेचे झालेली पडझड, पडलेले गटतट, ...

पालिका निवडणुकीत शिवसेना विशेष अस्तित्व निर्माण करणार
येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी माने म्हणाले, शहर व तालुक्यातील शिवसेनेचे झालेली पडझड, पडलेले गटतट, जुन्या शिवसेना कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून नव्या उमेदीने पालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळवून शिवसेनेचे अस्तित्व दाखवू. यदा-कदाचित वरिष्ठ पातळीवरून महाविकास आघाडी झाली तर जास्तीत जास्त जागा शिवसेनेच्या निवडून आणू. शहरातील प्रत्येक वार्डात शाखा, तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा व पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी शिवसेना हा एक समर्थ पर्याय जिल्ह्यात निर्माण करणार आहे.
शेतकऱ्यांसाठी सिंगल फेजचा पुरवठा महावितरणने बंद केला आहे. तो तत्काळ मुख्यमंत्र्यांशी बोलून सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, अजिंक्य लोंढे, निखिल राजपूत, हरिभाऊ सगरे, रवी घोरपडे, ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते.