शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार जणांनी केला दृष्टिदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

उदगीर : आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे कोणाच्या तरी कामी येतात ही जाणीव ठेवून सात हजार जणांनी ...

उदगीर : आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे कोणाच्या तरी कामी येतात ही जाणीव ठेवून सात हजार जणांनी येथील उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून दृष्टिदानाचा संकल्प केला आहे. नेत्रदानाच्या या यज्ञातून ३६० जणांना हे जग पाहता आले असून, मरावे परी नेत्ररूपे उरावे, या वचनाची सार्थकता सिद्ध झाली आहे.

२६ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. भारतात आजही नेत्रपटलाअभावी ५० लाख लोक पाहू शकत नाहीत. नेत्रदानाच्या बाबतीत आजही आपल्या देशात उदासीनता असून, दरवर्षी ९५ लाखांच्या आसपास मृत्यू होत असताना ही केवळ पन्नास हजार जणच नेत्रदान करतात. मृत्यूनंतर आपले डोळे कोणाच्या तरी कामाला येतील या भावनेने होणाऱ्या एकाच्या नेत्रदानामुळे दोघांना दृष्टी मिळते. ही बाब लक्षात घेऊन उदयगिरी लॉयन्स नेत्ररुग्णालयाने जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जाणीव जागृती करीत हजारो जणांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यातून ९०० जणांनी यावर्षी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. त्यापैकी ५०० जणांनी दृष्टिदानाचे संकल्प पत्र भरून दिले आहेत. हा यज्ञ सुरू झाल्यापासून आजपर्यंत ३६० जणांना दृष्टी मिळाल्याने नेत्रदाते शरीराने गेले तरी दृष्टी ने अमर झाले आहेत.

नेत्रदान चळवळीला गती...

कोरोनामुळे अंधत्व निवारण व नेत्रदान चळवळीला अनेक अडचणी आल्या. मात्र याच पंधरवड्यात आम्ही ही चळवळ गतिमान करण्यासाठी जाणीव जागृती केली असून, यशही आले आहे. बहुतांश रुग्णांचे डोळे हे संसर्गामुळे खराब होतात. अशा रुग्णांना नवीन दृष्टी मिळविण्यासाठी बुबुळ (कॉनिआ) महत्त्वाची भूमिका बजावते. मृत्यूनंतर नेत्रदान करणाऱ्यांचे डोळेच काढले जातात, असा गैरसमज आहे. परंतु नेत्रदान करताना संबंधित मृत व्यक्तीचे केवळ कॉनिआ पटल काढले जाते. यामुळे चेहरा जरासाही विद्रूप होत नाही. गरजवंत कुणाही रुग्णांना हे कार्निआ दान करता येते. असे उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया यांनी सांगितले.