...
माळेगाव कल्याणी येथे घरकूल मार्टचे उद्घाटन
निलंगा : तालुक्यातील माळेगाव कल्याणी येथे ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत घरकूल मार्टचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच भीम पोस्ते, उपसरपंच बळीराम मिरकले, ग्रामसंघाच्या अध्यक्षा सत्यभामा कलमुकले, उमेदचे तालुका व्यवस्थापक शरद सन्मुखराव, लिंबराज कुंभार आदी उपस्थित होते.
...
दादगी येथे मास्क, सॅनिटायझरचे वाटप
निलंगा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुक्यातील दादगी येथील युवकांनी एकत्र येऊन ४० हजारांचे मास्क, सॅनिटायझर गावातील नागरिकांना वाटप केले. यावेळी युवराज पवार, विलास गोबाडे, विश्वनाथ गोबाडे, शाहुराज पवार, सरपंच राजेंद्र जगताप, सत्यजीत गोबाडे, रवींद्र पवार, ग्रामसेवक पी.एन. राचुरे आदी उपस्थित होते.
...
उमरगा यल्लादेवी येथे लसीकरण मोहीम
शिरुर ताजबंद : उमरगा यल्लादेवी येथे कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी सरपंच विष्णुकांत सोमवंशी, उपसरपंच विजयकुमार फुलसे, डॉ.राहुल सारोळे, डॉ.मारोती पाटील, माधुरी धुमाळ, आर.बी. बचुटे, पद्माकर चिटबोणे आदी उपस्थित होते. यावेळी १०० जणांना कोविड लस देण्यात आली.
...
पाणीटंचाई वाढली
अहमदपूर : सध्या तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. प्रशासनाने अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
...
जांभळाची आवक
लातूर : शहरातील बाजारपेठेत जांभळाची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. १६० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. ग्राहकांकडून मागणीही होत आहे. पाऊस होताच, आणखीन आवक वाढेल, असे विक्रेत्यांनी सांगितले.
...
अननसाला मागणी
लातूर : शहरातील गंजगोलाई, बार्शी रोडवर सध्या अननसाची आवक होत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवक अधिक आहे. ४० ते १०० रुपये दराने विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.
....