खरोसा येथे सरपंच पदाच्या दावेदाराचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST2020-12-12T04:36:13+5:302020-12-12T04:36:13+5:30
खरोसा येथे सरपंच पदासाठी अनेकदा डावपेच आखून उमेदवारांच्या फोडाफोडीचे राजकारण रंगले आहे. दरम्यान, प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिद्ध ...

खरोसा येथे सरपंच पदाच्या दावेदाराचा शोध
खरोसा येथे सरपंच पदासाठी अनेकदा डावपेच आखून उमेदवारांच्या फोडाफोडीचे राजकारण रंगले आहे. दरम्यान, प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिद्ध झाल्याने नवख्या मतदारांकडून पाहणी करण्यात आली आहे. मतदार यादीतील नाव वगळणे, दुरुस्ती करणे ही कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. निवडणुकीच्या रिंगणात सक्षम उमेदवार रहावा म्हणून पॅनल प्रमुखाकडून बारकाईने चाचपणी सुरु आहे.
महिला सरपंच पदाच्या दावेदार असल्यामुळे बैठकीत उपसरपंच पदावर भर दिला जात आहे. काही प्रभागातून विद्यमान सदस्यांना वगळून नवख्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर काही विद्यमान सदस्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. येथे दोन पॅनल होण्याची शक्यता आहे.
...
श्यामसुंदर पाटील यांच्या १९ पुस्तकांचे प्रकाशन
खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा व खरोसा परिसरातील धार्मिक आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, धार्मिक स्थळांची माहिती संकलित करुन ती वाचकांना उपलब्ध करुन देण्यासाठी येथील शामसुंदर पाटील यांनी १९ पुस्तके लिहिली असून त्याचे प्रकाशन झाले आहे. जीवनाचे कटू सत्य, गाऊ मांगल्याचे गाणं, घेऊ दर्शन थोरांचे, एक अद्भुत शक्ती खरोसा नगरी, वारकऱ्यांच्या सहवासात, जीवन दर्शन, जागू ग्राम दैवताला, खरोसा हनुमान, महाशिवरात्री महोत्सव- खरोसा लेणी, पांडुरंग आले घरा, कृष्ण परमात्मा, पायी चारधाम यात्रा अशी १९ पुस्तके त्यांनी १९९० ते २०१६ या कालावधीत लिहिली असून त्यांचे प्रकाशन झाले आहे.