शाळा बंद असल्याने मुलांसाेबत पालकांचे मानसिक आराेग्य बिघडले ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST2021-08-23T04:22:49+5:302021-08-23T04:22:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून राज्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरातच अडकून पडले आहेत. ...

शाळा बंद असल्याने मुलांसाेबत पालकांचे मानसिक आराेग्य बिघडले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून राज्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरातच अडकून पडले आहेत. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु असले तरी त्यातून मुलांच्या आराेग्यावर परिणाम हाेत आहे. अनेक मुलांना डाेकेदुखी, मान, पाठ आणि कंबरदुखीचे आजार जडले आहेत. शिवाय काहींच्या चष्म्याचा नंबरही वाढला आहे. माेबाईलचे टायमिंग वाढल्याने अनेक मुलांना निद्रानाश या आजाराने बेजार केले आहे. याबराेबरच मुलांमध्ये चिडचिडेपणा, ओरडणे आणि शिवीगाळ करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या स्थितीत पालकांचेही मानसिक आराेग्य बिघडले आहे. मुलांना शिस्त लावणे, सतत बंधनात ठेवल्याने मुलांचेही मानसिक आराेग्य बिघडले आहे. सध्या पालक, मुलांच्या चेहऱ्यावर काेंडलेपणाची चिंता दिसून येत आहे.
मुलांच्या समस्या...
शाळा बंद असल्याने मुलांच्या अनेक समस्या नव्याने समाेर आल्या आहेत. यातून मुलांचे शालेय नियाेजन बिघडले आहे.
सध्या मुले ऑनलाईन शिक्षणासाठी दिवसेंदिवस माेबाईलच्या स्क्रिनसमाेर बसून आहेत. यातून आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
पाठ, कंबर, मान, डाेके दुखणे, डाेळ्यांना जळजळ करणे आदी आजार त्यांना जडले आहेत. यातून मुले आजारी पडण्याचे प्रमाणही माेठे आहे.
पालकांच्या समस्या...
मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांच्यासाेबत तासनतास बसावे लागत आहे. मुलांवर सतत लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. अशास्थितीत मुले ऐकतच नाहीत, ही बहुतांश पालकांची तक्रार आहे. यातून पालकांचेही मानसिक आराेग्य बिघडले आहे. मुलांना कसे हाताळावे, हा प्रश्न अनेक पालकांना सतावत आहे. मुलांचे शैक्षणिक नियाेजन बिघडले असून, चिंता वाढली आहे.
डाॅक्टर आणि शैक्षणिक तज्ज्ञ काय म्हणतात...
सध्या शाळा बंद असल्याने बहुतांश विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. या शिक्षणातही अनेक अडथळे आहेत. मुलांच्या मानसिकतेचा विचार करुन त्यांना हाताळले पाहिजे. सतत अभ्यास कर, असे दडपण त्यांच्यावर लादू नका, घरात बसून मुले कंटाळली आहेत. यासाठी सकारात्मक विचारातून मुलांकडे पाहावे.
- डाॅ. विश्रांत भारती, लातूर
गत दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने, मुले घरीच अडकून पडली आहेत. अशास्थितीत सर्वच शिक्षण ऑनलाईन सुरु आहे. तासनतास एकाच ठिकाणी बसून राहावे लागत असल्याने मुलांमध्ये नैराश्य येत आहे. अनेकांना अभ्यास नकाेनकाेसा झाला आहे. त्यातच पालकांचे अभ्यासाबाबत दडपण, ओरडणे सुरु आहे. यातून मुले आणि पालकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
- डाॅ. ओमप्रकाश कदम, लातूर