उर्वरित इमारतही दुरुस्तीला
हासाळा येथील एक वर्गखोली कोसळली, तर इतर दोन वर्गखोल्यांचीही दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी म्हणाल्या, जीर्ण झालेली वर्गखोली पाडण्यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केला होता. सद्यस्थितीत ती खोली वापरात नव्हती. तर शिक्षणाधिकारी विशाल दशवंत म्हणाले, स्थळ पाहणी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केलेला आहे.
वर्गखोली कोसळल्याने निर्माण झालेले प्रश्न
जिल्हा परिषदेची बांधलेली वर्गखोली २५ वर्षांतच कशी काय कोसळली हा प्रश्न आहे. त्यावर संबंधितांनी सदर वर्गखोली लोडबेअरिंगची होती आणि तेथे प्रचंड काळी माती असल्याने खोली लवकर जीर्ण झाली.
ग्रामपंचायतीने जीर्ण खोली पाडण्यासाठी प्रस्ताव देऊनही ती खोली आपोआप पडेपर्यंत वाट का पाहिली, याचेही उत्तर यंत्रणेला द्यावे लागेल.
कोरोनामुळे शाळा बंद होती. परिणामी, विद्यार्थ्यांचा वावर त्या खोलीच्या परिसरात नव्हता. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता तर त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.