स्वाधार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:13 IST2025-03-05T19:09:41+5:302025-03-05T19:13:18+5:30

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आहे.

savaadhaara-saisayavartataisaathai-onalaaina-araja-karanayaasa-15-maaracaparayanta-maudatavaadha | स्वाधार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

स्वाधार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात आलेले आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाने १५ मार्चपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आहे. ज्या विद्यार्थ्यांना पात्र असूनही वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेचे अर्ज भरण्याची मुदत १५ जानेवारीपर्यंत होती. परंतु या योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत असल्यामुळे या मुदतीत अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे शासनाने १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

बँक तपशीलही विद्यार्थ्यांनी द्यावा....
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी भरले आहेत. त्यांना बँक तपशील भरण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी बँक तपशील भरून अर्ज करावा, बँक डिटेल्स असणे आवश्यक आहे. तरच स्कॉलरशिप मंजूर होते.

Web Title: savaadhaara-saisayavartataisaathai-onalaaina-araja-karanayaasa-15-maaracaparayanta-maudatavaadha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.