शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

लातूर-बार्शी महामार्गावरील साखरा पाटी परिसर बनला ‘ब्लॅक स्पॉट’; १६ अपघातात १७ जण झाले ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 1:08 PM

अपघात प्रवण क्षेत्र म्हणून उपाययोजना करण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे.

ठळक मुद्देलातूर-बार्शी महामार्गावरील साखरा पाटी परिसर अपघात प्रवण क्षेत्र  अरुंद रस्ता आणि वळणामुळे हे अपघात होत असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले.

लातूर : बार्शी महामार्गावरील रामेगाव ते बारा नंबर पाटी दरम्यानचा मार्ग अपघात प्रवण क्षेत्र ठरला आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या चौदा महिन्यांच्या कालावधीत एकूण १६ अपघात झाले. या अपघातामध्ये १७ नागरिक ठार झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. रामेगाव ते साखरा पाटी हा मार्ग ब्लॅक स्पॉट ठरला आहे. 

लातूर-बार्शी राज्य महामार्ग हा दळणवळणासाठी सोयीचा मार्ग आहे.  परिणामी, या मार्गावर रात्रं-दिवस वाहनांची मोठी वर्दळ असते. टेंभुर्णी ते निजामाबाद असा हा मार्ग महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला जोडणारा आहे. लातूर ते मुरुड या महामार्गावरील साखरा पाटी ते रामेगाव हा परिसर सध्या अपघात प्रवण क्षेत्र ठरला आहे. या ठिकाणी होणाऱ्या अपघातांची मालिका थांबत नसल्याचे चित्र आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या चौदा महिन्यांच्या कालावधीत एकूण १६ भीषण अपघात झाले. जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये १३ अपघातांची नोंद असून, दहा जण ठार झाले आहेत. तर जानेवारी, फेब्रुवारी २०१९ मध्ये तीन अपघात झाले. यामध्ये ७ जण ठार झाल्याची नोंद गातेगाव पोलीस ठाण्यात आहे. महिन्याला किमान एक मोठा अपघात साखरा पाटी ते रामेगाव या दरम्यानच्या मार्गावर हमखास होतो, असा अनुभव गेल्या पाच वर्षांचा आहे. अरुंद रस्ता आणि वळणामुळे हे अपघात होत असल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले.

बुधवारी पहाटेही एका अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविल्याची घटना घडली. या अपघातात २४ वर्षीय तरुण ठार झाला आहे. फेब्रुवारीमध्ये एका टिप्परने भरदुपारी तीन दुचाकीला उडविले होते. या अपघातात दोघे जण जागीच ठार, दोघांचा उपचारासाठी रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. गातेगाव पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. या पत्राची साधी दखलही संबंधित विभागाने घेतली नाही. हा मार्गच आता धोकादायक ठरला आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले पत्र...लातूर-बार्शी राज्य महामार्गावरील रामेगाव ते साखरा पाटी या दरम्यानचा मार्ग अपघात प्रवणक्षेत्र ठरला आहे. याबाबत गातेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठविण्यात आले होते. हा पॉर्इंट डेंजर झोन म्हणून जाहीर करावा. त्याचबरोबर रस्त्याची रुंदी वाढवावी, असेही पत्रात नमूद करण्यात आल्याचे सपोनि. संभाजी कटारे यांनी सांगितले. रामेगाव ते साखरा पाटी मार्गाच्या साईड पट्ट्या भरून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हा मार्ग जम्पिंग रोड असल्याने अपघाताच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. अपघात प्रवण क्षेत्र म्हणून उपाययोजना करण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे. वाहन धारकांनी आपल्या वाहनाचा वेग कमी ठेवला पाहिजे. त्याचबरोबर रस्त्याचा अंदाज घेऊन वाहन चालविणे अधिक हिताचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूlaturलातूर