दीक्षाभूमी एक्स्प्रेसचे अंतर कमी करण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:11+5:302021-06-16T04:27:11+5:30

नागपूर-जबलपूर मार्ग उपलब्ध पुण्याएवजी लातूरमार्गे सुरू करण्याची मागणी केली हाेती. त्यावेळी नागपूर, गाेंदिया-नैनपूर-जबलपूर हा मार्ग उपलब्ध नव्हता. आता हा ...

Sakade to reduce the distance of Deekshabhoomi Express | दीक्षाभूमी एक्स्प्रेसचे अंतर कमी करण्यासाठी साकडे

दीक्षाभूमी एक्स्प्रेसचे अंतर कमी करण्यासाठी साकडे

नागपूर-जबलपूर मार्ग उपलब्ध

पुण्याएवजी लातूरमार्गे सुरू करण्याची मागणी केली हाेती. त्यावेळी नागपूर, गाेंदिया-नैनपूर-जबलपूर हा मार्ग उपलब्ध नव्हता. आता हा मार्ग सुरू झाला आहे. इटारशी मार्गावर वाहतूक अधिक आहे. मात्र, गाेंदिया-नैनपूर-जबलपूर या मार्गावर वाहतूक अधिक नाही. लातूर ते लातूर राेड हे अंतर ३३ किलाेमीटरचे असून, या मार्गावर तीन मिनिटांचा लूज टाइम आहे. ताे कमी करावा, नांदेड ते अदिलाबाद हा मार्ग १८५ किलाेमीटरचे आहे. या मार्गावर एक तास लूज टाइम आहे, ताे कमी करावा, अदिलाबाद ते माजरी हे अंतर १०१ किलाेमीटरचे असून, या मार्गावरही एक तासाचा लूज टाइम आहे. ते कमी करण्याची गरज आहे. यातून सात तासांची आणि पैशाची बचत हाेणार आहे, असेही श्यामसुंदर मानधना यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Sakade to reduce the distance of Deekshabhoomi Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.