शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

सहकारमहर्षी शिवाजीराव नाडेंचे निधन, पालकमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 23:32 IST

जुन्या पिढीतील शिवाजीराव नाडे ज्येष्ठ नेते होते. लातूर- उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य लोकाभिमुख होते. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले

ठळक मुद्देजुन्या पिढीतील शिवाजीराव नाडे ज्येष्ठ नेते होते. लातूर- उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य लोकाभिमुख होते. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले

मुरूड (जि. लातूर) : सहकारमहर्षी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव तुकाराम नाडे उर्फ काकासाहेब (९६, रा. मुरूड) यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

जुन्या पिढीतील शिवाजीराव नाडे ज्येष्ठ नेते होते. लातूर- उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य लोकाभिमुख होते. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. मुरूड येथील जनता विद्यामंदीर संस्थेचे ते पदसिद्ध अध्यक्ष होते. मुरूड ग्रामपंचायत त्यांच्या नेतृत्वात बिनविरोध होती.  त्यांनी तब्बल ३८ वर्षे सरपंच म्हणून कार्यभार पाहिला होता. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवाजीराव नाडे यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. शिक्षण घेत असताना त्यांनी हैदराबाद  मुक्तीसंग्रामात सहभाग घेतला होता. निजामाच्या विरोधातील सशस्त्र लढ्यात त्यांचे योगदान होते.

स्वातंत्र्यानंतर त्यांनी बीडचे तत्कालीन खासदार कै. बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मुरूड परिसरात ग्रामविकासाला सुरूवात केली. ग्रामविकासाच्या अनेक योजना त्यांच्या पुढाकाराने राबविल्या गेल्या. खादी उद्योगातून विणकाम, हातकाम, सुतकतई आदी उद्योग सुरू केले होते. १९९२ मध्ये त्यांनी रूरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुरूड सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. सहकार संस्थेचे जाळेही त्यांनी उभारले. जिल्हा मार्केटिंग संस्थेचे ते अध्यक्ष राहिले. ढोकीचा तेरणा सहकारी साखर कारखाना, लातूरची सात मजली जिल्हा बँक तसेच सहकार तत्वावरील डाल्डा फॅक्टरीच्या स्थापनेत त्यांचा सिहांचा वाटा होता. दूरसंचार, वीज, रेल्वे, वृक्ष लागवड आदी क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य होते. ग्रामविकास संस्था व क्षेत्र विकास समितीची स्थापनाही त्यांच्या नेतृत्वात झाली. १९८० मध्ये लातूर विधानसभा निवडणुकीत ते एस. काँग्रेसचे उमेदवार होते. थोड्या मतांनी त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. 

जुन्या पिढीतील आदर्शवत नेतृत्व हरपले : पालकमंत्री अमित देशमुख

जुन्या पिढीतील आदर्शवत नेतृत्व, सहकारमहर्षी शिवाजीराव नाडे यांचे निधन दु:खदायक आहे. त्यांनी सहकार, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नि:स्पृह वृत्तीने योगदान दिले आहे. त्यांचे योगदान स्मरणीय आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली. 

टॅग्स :laturलातूरDeathमृत्यू