उदगीर तालुक्यात रुद्रवाडी, टाकळी, धडकनाथ बिनविराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST2021-01-01T04:14:38+5:302021-01-01T04:14:38+5:30
बुधवार नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी तालुक्यातील ६१ गावातून १५४० नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले ...

उदगीर तालुक्यात रुद्रवाडी, टाकळी, धडकनाथ बिनविराेध
बुधवार नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी तालुक्यातील ६१ गावातून १५४० नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले होते. गुरुवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत १० अर्ज अवैध ठरविण्यात आले. तसेच विविध गावातील २५ प्रभाग बिनविरोध आले. तर रूद्रवाडी, टाकळी, धडकनाळ आदी तीन गावे बिनविरोध निघाली आहेत. तालुक्यातील आडोळवाडी, एकुर्का रोड, गुरधाळ, जानापूर कुमठा खु., गंगापूर, डांगेवाडी, कोदळी, सुमठाणा, बोरगाव, मल्लापूर, भाकसखेडा, शेल्लाळ या गावातील काही प्रभाग बिनविरोध आले आहेत. पैकी आडोळवाडी, इस्मालपूर, कोदळी या गावातील काही प्रभागासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. छाननी दरम्यान एकूण १० अर्ज अवैध झाले असून उर्वरित १५३० एवढे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. १० अर्ज अवैध ठरल्यामुळे काही जागा बिनविरोध आल्या आहेत. त्यात गुरदाळ, खेर्डा, डांगेवाडी, डाऊळ हिप्परगा या गावातील ४ उमेदवार बिनविरोध आले आहेत. असे एकूण बिनविरोध व काही गावच्या प्रभागाचे मिळून एकूण ५० उमेदवार बिनविरोध आले आहेत. सदर प्रक्रियेसाठी ६१ ग्रामपंचायतीसाठी २३ निवडणूक निर्णय अधिकारी व २३ क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात आले होते. सदर छाननी दरम्यान निवडणूक निरीक्षक अनंत कुंभार यांनी भेट देऊन काही सूचना केल्या. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे, प्रज्ञा कांबळे, महाजन, बेंबळगे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी व निवडणूक विभागातील कर्मचारी उपस्थित होते.