दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी भाषण करताना रितेश यांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 14:30 IST2024-02-18T14:00:29+5:302024-02-18T14:30:53+5:30

रितेश यांच्या आई वैशालीताई देशमुख यांचे डोळे पाणावले.

Ritesh Deshmukh breaks down in tears while speaking on the occasion of unveiling the statue of late leader Vilasrao Deshmukh. | दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी भाषण करताना रितेश यांना अश्रू अनावर

दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी भाषण करताना रितेश यांना अश्रू अनावर

लातूर : माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लातूर येथे रविवारी झाले. यावेळी विलास कारखाना परिसरात आयोजित सोहळ्यात बोलताना विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेते रितेश यांना वडिलांच्या आठवणीने हुंदका आला. डोळे पानावले. अख्खे भाषण त्यांनी कंठ दाटलेल्या स्वरात केले.

रितेश यांचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू आले. भाषण थांबले. त्यावेळी रितेश यांच्या आई वैशालीताई देशमुख यांचे डोळे पाणावले. बाजूला बंधू माजी मंत्री अमित देशमुख यांनी रितेश यांच्या पाठीवर हात ठेवत धीर दिला. त्यावेळी आई वैशालीताई आणि काका दिलीपराव देशमुख यांच्यासह मंचावर आणि उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Web Title: Ritesh Deshmukh breaks down in tears while speaking on the occasion of unveiling the statue of late leader Vilasrao Deshmukh.