तालुक्यात ४४ हजार ८८० हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असून, १०५ टक्के पेरणी झाली होती. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला होता. ४२ हजार ७२१ हेक्टरवर सोयाबीन, तूर २ हजार ९७३, ज्वारी ५१५, मूग ४८६, उडीद २३०, मका २२५, तीळ ५५ यासह अन्य पिकांचा एकूण ४७ हजार २५१ हेक्टरवर पेरा झाला होता. २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने फुलोऱ्यात असलेल्या सोयाबीनसह अन्य पिके सुकू लागली होती. त्यामुळे शेतकरी स्प्रिंकलरने पाणी देऊन पिके जगविण्याचा प्रयत्न करत होते.
दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या पाऊस होत असल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे. आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. तालुक्यातील रेणापूर मंडळात १० मिमी, पळशी १५, कारेपूर १३, पानगाव ८, पोहरेगाव ३६ मिमी असा एकूण सरासरी १६.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.