जळकोट येथे पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:20+5:302021-06-23T04:14:20+5:30

अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे जळकोट येथे अहमदपूर उपविभागाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांचा ...

Review meeting of police officers at Jalkot | जळकोट येथे पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक

जळकोट येथे पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक

अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे जळकोट येथे अहमदपूर उपविभागाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात जळकोट, अहमदपूर, वाढवणा (बु.), किनगाव या पोलीस ठाण्यांतील ठाणे प्रभारी व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

यावेळी उपविभागातील पोलीस ठाणे अहमदपूरचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, जळकोटचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ बोईनवाड, सहायक फौजदार पठाण, उत्तम रावणकोळे, पोहेकॉ. प्रकाश चिमनदरे, किशन शेळके, गोविंद पवार, अंकुश कांबळे, रमेश मिटकरी, हणमंत माळी, पोना गणेश मालवदे, सूर्यकांत धाकपाडे, पद्माकर जायभाये, फेरोज सय्यद, मपोना राजश्री हेंगणे, राहुल वडारे, चंद्रकांत चपडे, दिगंबर गायकवाड, राजेश यादव, कैलास शिंदे, गृहरक्षक दलाचे जवान संगमेश्वर नामवाड, नवाज कोतवाल, तांबोळी यांनी सहभाग नोंदविला.

पोलीस ठाणे वाढवणा (बु.)चे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, पोलीस नाईक कसबे, मपोना अश्विनी गडदे, किनगावचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, सहायक फौजदार अलापुरे, पोहेकॉ. गोपाळ डोईजड, नरहरे, शेटकार, गुट्टे यांनी यावेळी उपस्थित राहून गुन्ह्यांच्या सद्य:स्थितीबाबत माहिती दिली.

या गुन्हा आढावा बैठकीचे औचित्य साधून जळकोट येथील पोलीस अमलदार दिगंबर गायकवाड व पद्माकर जायभाये यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Review meeting of police officers at Jalkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.