आरसीसीचे विद्यार्थी आता राज्यात नव्हे; देशातील टॉपर्सच्या यादीत चमकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 06:20 IST2021-04-30T06:15:19+5:302021-04-30T06:20:15+5:30

दोन हजार विद्यार्थ्यांना स्काॅलरशिप : २ मे रोजी आरसीसी सेट फेज-१ ऑनलाईन टेस्ट

RCC students are no longer in the state; Shine in the list of toppers in the country! | आरसीसीचे विद्यार्थी आता राज्यात नव्हे; देशातील टॉपर्सच्या यादीत चमकणार

आरसीसीचे विद्यार्थी आता राज्यात नव्हे; देशातील टॉपर्सच्या यादीत चमकणार

लातूर : आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीमुळे देशभरात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या प्रा. शिवराज मोटेगावकर  संचलित आरसीसीच्या विद्यार्थ्यांची नीट निकालातील वर्चस्वता अजून उंचावणार आहे. हजारो डॉक्टर, इंजिनिअर घडविणाऱ्या आरसीसी लातूर पॅटर्नने आता नांदेडमध्ये ‘पी.सी.बी.’ अर्थात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयाचे शिक्षण एकाच छताखाली देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आरसीसीचे गुणवंत देशातील टॉपर्स यादीत चमकतील.

नीट आणि आयआयटी-जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५ मे २०२१ पासून पीसीबी फाउंडेशन कोर्स पूर्णतः मोफत सुरू करणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन सुद्धा नि:शुल्क करता येईल. रविवार, २ मे रोजी ‘आरसीसी सेट फेज-१’ ही ऑनलाईन पद्धतीने टेस्ट होणार आहे. त्यासाठी फ्री रजिस्ट्रेशन चालू असून रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. यामध्ये जो प्रश्नपत्रिका पॅटर्न आहे तो पीसीएम ग्रुप आणि पीसीबी ग्रुप असा वेगवेगळा असेल. मेडिकल ग्रुप अर्थात पीसीबी ग्रुपसाठी ९० प्रश्न दहावीच्या विज्ञान विषय पुस्तकातील असतील. तर इंजिनिअरिंग ग्रुप अर्थात पीसीएमसाठी गणित आणि विज्ञान असे प्रत्येकी ४५/४५ गुण असणार आहेत. (वा. प्र.)

गुणवतेची खाण महाराष्ट्राची शान " असणाऱ्या मोटेगावकर यांच्या आरसीसीचे विद्यार्थी आता राज्यात नव्हे तर देशातील टॉपर्स च्या यादीत चमकणार.  लातूर च्या घवघवीत यशानंतर निकालातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी नांदेड मध्ये सुद्धा "पी.सी.बी." एकाच छताखाली. 
फ्री फाऊंडेशन कोर्सची "आरसीसी-सेट फेज-१ " रविवारी.  

यामध्ये नांदेड आणि लातूर सेंटरवरून प्रत्येकी ५०० विद्यार्थ्यांना फी मध्ये भरघोस सवलत देण्यात येणार असल्याची माहिती ‘आरसीसी‘च्या वतीने देण्यात आली आहे. ‘पीसीबी एकाच छताखाली‘ हे लातूरमध्ये २ वर्ष सुरू आहे. याच धर्तीवर संपूर्ण तयारीने संपूर्ण टीमसह ‘पीसीबी‘ साठी नांदेडमध्ये आरसीसीने पाऊल टाकले आहे.
 

Web Title: RCC students are no longer in the state; Shine in the list of toppers in the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.