श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानांतर्गत रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:19 IST2021-01-25T04:19:56+5:302021-01-25T04:19:56+5:30

येथील स्वा. सावरकर चौकात शनिवारी सकाळी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची पूजा सरपंच किशोर मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, ...

Rathyatra under Shriram Temple Fundraising Campaign | श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानांतर्गत रथयात्रा

श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानांतर्गत रथयात्रा

येथील स्वा. सावरकर चौकात शनिवारी सकाळी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची पूजा सरपंच किशोर मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, माजी सरपंच विठ्ठलराव बोडके यांच्या हस्ते करण्यात येऊन मिरवणुकीस सुरुवात झाली. हनुमान मंदिर येथे आरती करण्यात आली. यावेळी गावातील भाविकांनी पुष्पवृष्टी केली. महिला भाविकांनी गल्लोगल्ली स्वागत करीत पूजा केली. यावेळी हेमंत गुट्टे, अमोल नराळे, धनराज गिरी, दिनकर मुंडे, उपसरपंच प्रा. चेतन मुंडे, श्रीधर फड, प्रा. अजय फड, पंडितराव बोडके, शिवराज भुसाळे, बाळू चाटे, शिवाजी बोडके, गणेश पांचाळ, नितीन मुंडे, हरिश्चंद्र सोनवणे, चंद्रप्रकाश हंगे, सोमनाथ किंनकर, दिनेश भताने, तुकाराम फड, भास्कर मुंडे, सतीश लड्डा, व्यंकट दहिफळे, बाळू किनकर, विठ्ठल कांबळे, वीरभद्र शेळके, केशव बोडके, योगेश आंधळे, अंशिराम वनवे, मुकिंद श्रीमंगले आदी उपस्थित होते.

Web Title: Rathyatra under Shriram Temple Fundraising Campaign