लातूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर छापेमारी, ४७ गुन्हे दाखल, चार लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Updated: January 21, 2025 05:36 IST2025-01-21T05:34:38+5:302025-01-21T05:36:35+5:30
Latur News: लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर साेमवारी एकाच दिवशी पाेलिस पथकांनी छापेमारी केली. या कारवाईत ४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

लातूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर छापेमारी, ४७ गुन्हे दाखल, चार लाखांचा मुद्देमाल जप्त
- राजकुमार जाेंधळे
लातूर - जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर साेमवारी एकाच दिवशी पाेलिस पथकांनी छापेमारी केली. या कारवाईत ४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, याबाबत ४७ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायावर कारवाईसाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी विशेष माेहीम राबविण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार साेमवारी पहाटे अचानकपणे लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर छापा मारण्यात आला. यामध्ये हातभट्टी दारूची निर्मिती करणाऱ्या, देशी-विदेशी दारूची अवैध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ४९ जणांविराेधात ४७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ४ लाख १७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय, हजाराे लिटर हातभट्टी आणि त्यासाठी लागणारे रसायन पाेलिस पथकांनी नष्ट केले आहे.
२३ ठाण्यांच्या हद्दीत कारवाई...
जिल्ह्यातील एकूण २३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. यासाठी २३ अधिकारी, १०९ पोलिसांची विशेष पथके नियुक्त केली हाेती. या पथकाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात लपून-छपून हातभट्टी तयार करून, साठा करुन विक्री केली जात हाेती. दरम्यान, काहीं जणांकडून देशी-विदेशी दारुचीही अवैद्य विक्री केली जात हाेती.