लातुरात दुकानावर छापा; गुटख्यासह एकाला अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: May 4, 2025 23:53 IST2025-05-04T23:53:22+5:302025-05-04T23:53:33+5:30

Latur News: लातूर शहरातील बार्शी मार्गावर असलेल्या एका किराणा दुकानावर छापा मारून दाेन लाखांच्या गुटख्यासह एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी करण्यात आली असून, याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raid on shop in Latur; One arrested with gutkha | लातुरात दुकानावर छापा; गुटख्यासह एकाला अटक

लातुरात दुकानावर छापा; गुटख्यासह एकाला अटक

- राजकुमार जाेंधळे 
लातूर - शहरातील बार्शी मार्गावर असलेल्या एका किराणा दुकानावर छापा मारून दाेन लाखांच्या गुटख्यासह एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी करण्यात आली असून, याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत बार्शी मार्गावर पाण्याच्या टाकीनजीक एका किराणा दुकानात गुटख्याची विक्री करण्यासाठी साठा करून ठेवल्याची माहिती खबऱ्याने पाेलिस पथकाला दिली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर एमआयडीसी ठाण्याच्या पाेलिसांनी सागर किराणा दुकानावर छापा मारला. यावेळी १ लाख ९७ हजार १९० रुपयांचा गुटखा आढळून आला असून, इरफान हबीब शेख (वय ४१, रा. काझी मोहल्ला, आनंद नगर लातूर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुरनं. ३६४/२०२५ कलम १२३,२७४,२७५,२२३ बीएनएसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे हे करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर देडे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, सहायक फाैजदार भीमराव बेल्लाळे, शिंगाडे, अंमलदार भगवत मुळे, बळवंत भोसले, राजाभाऊ मस्के, प्रशांत ओगले, ईश्वर तुरे, पल्लवी शिवणकर यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Raid on shop in Latur; One arrested with gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.