पूर्णा- हैदराबाद पॅसेंजर धावणार आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:23+5:302021-07-19T04:14:23+5:30

पूर्णा स्थानकावरून ही गाडी सकाळी ७.४० वा. सुटेल. लातूर रोड येथे ११.४० वा., उदगिरात दुपारी १२.२१ वा., बिदर येथे ...

Purna-Hyderabad passenger will run from today | पूर्णा- हैदराबाद पॅसेंजर धावणार आजपासून

पूर्णा- हैदराबाद पॅसेंजर धावणार आजपासून

पूर्णा स्थानकावरून ही गाडी सकाळी ७.४० वा. सुटेल. लातूर रोड येथे ११.४० वा., उदगिरात दुपारी १२.२१ वा., बिदर येथे दुपारी २.१० वा. तर हैदराबाद येथे रात्री ७.१० वा. पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी हैदराबादहून सकाळी ८.२० वा. सुटेल. बिदर येथे ११.२० वा., उदगीर येथे दुपारी १.४० वा., लातूर रोड येथे २.५२ वा. आणि पूर्णा येथे रात्री ९ वा. पोहोचेल.

या गाडीसाठी अनारक्षित तिकिटांची व्यवस्था असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. या रेल्वेसाठी उदगीर, लातूर रोड स्थानकात व खासगी तिकीट विक्री प्रणाली चालू केली आहे. मात्र, ही विशेष रेल्वे असल्यामुळे एक्सप्रेस गाडीप्रमाणे तिकीट दर असतील. नुकतेच विभागीय व्यवस्थापक परळी आणि उदगीर दौऱ्यावर असतानाच दिवसाची सवारी गाडी सुरू करणार असल्याचे उदगीर रेल्वे संघर्ष समितीस माहिती दिल्याचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले.

Web Title: Purna-Hyderabad passenger will run from today