रेणापुरात २ हजार ५४८ जणांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST2021-05-28T04:15:56+5:302021-05-28T04:15:56+5:30
यामध्ये दारूबंदी, विनामास्क, विनाकारण मोटर वाहनावर फिरणे, लग्न समारंभात नियम मोडणे, परवाना नसताना आस्थापना उघडणे आदी नियमांचे उल्लंघन करण्यात ...

रेणापुरात २ हजार ५४८ जणांवर दंडात्मक कारवाई
यामध्ये दारूबंदी, विनामास्क, विनाकारण मोटर वाहनावर फिरणे, लग्न समारंभात नियम मोडणे, परवाना नसताना आस्थापना उघडणे आदी नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार १ जानेवारीपासून ते २४ मे २०२१ या कालावधीत पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, सहायक पो.नि. क्रांती निर्मल, पो.उ.नि. नागसेन सावळे, स.पो.उ.नि. राजकुमार गुळभिले, पो.उ.नि. गौतम कांबळे, पोलीस कर्मचारी अनंत बुधडकर, मुक्तार शेख, गौतम घाडगे, संतोष ठाकरे, रावसाहेब तांदळे, किरण शिंदे, संतोष गायकवाड, साजिद शेख, थोरात, श्रीकृष्ण शेळके, बालाजी डपडवाड यांच्यासह होमगार्ड यांनी पाच महिन्यांमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
विनामास्क फिरणाऱ्या १९१८ जणांना दंड...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्या १ हजार ९१८ जणांवर कारवाई करून २ लाख ४ हजार ६५० रुपये, विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्या ५६५ व्यक्तींवर कारवाई करीत १ लाख ५५ हजार ७०० रुपये दंड वसूल केला आहे. तसेच २ लग्नसमारंभात उपस्थितीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. परवानगी नसताना आस्थापना उघडी ठेवणाऱ्या २८ दुकानदारांवर कारवाई करून ३१ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. तसेच दारुबंदीचे ३५ गुन्हे दाखल करून ८ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे...
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी नागरिकांनी नियमांचे काटेकारपणे पालन करावे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजन चाचणी केली जात आहे. तसेच पोलीस प्रशासनाच्या स्पीकरच्या माध्यमातून कोरोनाविषयक जनजागृती केली जात आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी केले आहे.