शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक सहलीस निघालेली खाजगी बस उलटली, ३९ विद्यार्थी बालंबाल बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 17:27 IST

चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथील सहल; सोलापूर जिल्ह्यात अपघात

- हरी मोकाशे

चाकूर (जि. लातूर) : शैक्षणिक सहलीसाठी कोल्हापूरला जाणाऱ्या चाकूर तालुक्यातील शिवणखेड (बु.) येथील विद्यार्थ्यांची खाजगी बस उलटल्याची घटना गुरुवारी पहाटे ३.३० वा. च्या सुमारास मंगळवेढा (जि. सोलापूर) नजिक घडली. सुदैवाने ३९ विद्यार्थ्यांसह ७ कर्मचारी बालंबाल बचावले. अपघातातील जखमीवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.

चाकूर तालुक्यातील शिवणखेड (बु.) येथील श्री गणेश विद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल कोल्हापूर, पन्हाळगड, राजवाडा येथे आयोजित करण्यात आली होती. या सहलीसाठी शाळेतील २१ मुले, १८ मुली, चार शिक्षक, दोन शिक्षिका आणि एक शिपाई असे एकूण ४६ जण एका खाजगी बस (एमएच २४, एबी ७२८१) मधून बुधवारी रात्री १० वाजता कोल्हापूरकडे निघाले होते. ही खाजगी बस गुरुवारी पहाटेच्या सुमारास मंगळवेढानजिक पोहोचली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन एका बाजूस उलटली. अपघातात काही मुले, कर्मचारी किरकोळ जखमी झाले. तात्काळ रुग्णवाहिका बोलावून सर्व विद्यार्थ्यांवर मंगळवेढा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या बसमधून सर्व विद्यार्थ्यांना लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ तपासणी करुन उपचार केले. बहुतांश मुलांना थोडासा तर काहींना मुकामार लागल्याने औषधोपचार करुन सायंकाळच्या सुमारास सुटी करण्यात आली.

काळ्याकुट्ट अंधारात जोरदार आरडाओरड..पहाटेची वेळ असल्याने सर्व मुले झोपेत होती. बस उलटल्याने एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड करण्यास सुरुवात झाली. अंधारामुळे काहीही दिसत नव्हते. चाचपडत काही मुले, शिक्षक बसमधून बाहेर पडले आणि बसमध्ये अडकलेल्या मुलांना सुखरुप बाहेर काढले. यावेळी बस चालकही अडकून पडला होता. त्यालाही शिक्षकांनी बाहेर काढले.

सहकारमंत्र्यांकडून चौकशी...अपघाताची माहिती मिळताच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी तात्काळ विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विद्यार्थ्यांवर उपचाराबरोबर आवश्यक ती सर्व मदत करण्यात यावी, अशा सूचना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासनास केल्या.

सर्व मुलांची प्रकृती चांगली...अपघातातील १५ ते २० मुलांना थोडाफार मार लागल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच काही विद्यार्थ्यांचे एक्स- रे काढण्यात आले आहेत. सर्व मुलांची प्रकृती चांगली आहे. त्यामुळे त्यांची रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे.- डॉ. सचिन जाधव, वैद्यकीय अधीक्षक, सर्वोपचार.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर