बियाणे, खत पुरवठ्यासाठी खरीप हंगामपूर्व बैठक घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:24 AM2021-04-30T04:24:24+5:302021-04-30T04:24:24+5:30

गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनसह इतर पिकांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे स्वत:चे बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध आहे. गतवर्षी ...

Pre-kharif meeting should be held for supply of seeds and fertilizers | बियाणे, खत पुरवठ्यासाठी खरीप हंगामपूर्व बैठक घ्यावी

बियाणे, खत पुरवठ्यासाठी खरीप हंगामपूर्व बैठक घ्यावी

Next

गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनसह इतर पिकांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे स्वत:चे बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध आहे. गतवर्षी उगवणक्षमता अत्यंत कमी असलेल्या बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. यावर्षी शेतकऱ्यांना उगवणक्षमता असलेले योग्य दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे व मागणीप्रमाणे खते पुरवठा करून देण्यासाठी आणि बियाणे व खतांची टंचाई निर्माण होवू नये, यासाठी पेरणीपूर्व नियोजन होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी तसेच राज्यस्तरावर खते व बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत मागणी नोंदविणे व नियोजन करण्यासाठी खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करणे आवश्यक आहे, असेही आ. पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Pre-kharif meeting should be held for supply of seeds and fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.