शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील एका विद्युत खांबामुळे अहमदपुरात दोन कि.मी.पर्यंत वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST

अहमदपूर : शहरात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरातील अंबाजोगाई रोडवरील ग्रामीण रुग्णालयासमोरील एका विद्युत खांबामुळे तब्बल दोन कि.मी.पर्यंत ...

अहमदपूर : शहरात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरातील अंबाजोगाई रोडवरील ग्रामीण रुग्णालयासमोरील एका विद्युत खांबामुळे तब्बल दोन कि.मी.पर्यंत वाहतूक ठप्प होत आहे. याकडे महामार्ग प्राधिकरण व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, वाहतूक नियंत्रणासाठी केवळ दोन होमगार्ड असल्याने वाहतुकीची समस्या सातत्याने उद्भवत आहे.

अहमदपूर शहरातून नागपूर- रत्नागिरी आणि अहमदपूर- अंबाजोगाई हे दोन प्रमुख मार्ग जातात. दोन्ही मार्गांवर सतत अवजड वाहनांची ये- जा असते. त्यातच शहरातील व बाहेरील वाहनधारकांमुळे स्वा. सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाजोगाई रोडवर सतत वाहतूक ठप्प होत असते. त्यामुळे तब्बल दोन कि.मी.पर्यंत रांगा लागतात. त्यातच अहमदपूर- अंबाजोगाई मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. एका बाजूने रस्ता काम सुरू असतानाही ग्रामीण रुग्णालयासमोरील एक विद्युत खांब अद्यापही काढण्यात आला नाही. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखीन भर पडत आहे. परिणामी, पोलीस ठाण्यासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. याबाबत पोलीस प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

हा विद्युत खांब काढण्यासाठी महावितरण, महामार्ग प्राधिकरणाने अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच शहरातील अनधिकृत वाहतुकीचे थांबे असून, तहसील कार्यालयासमोर तर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. शहरातील दहा कि.मी.वरील वाहतूक सांभाळण्यासाठी एक पोलीस कॉन्स्टेबल आणि दोन होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश वेळेस त्यांना काही जण जुमानत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यातच ऑटोरिक्षा व दुचाकीस्वार पुढे जाण्याच्या घाईमध्ये पूर्णत: रस्त्यावरील वाहतूक ठप्प करीत आहेत. याबाबत अहमदपूर शहर वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले.

अवैध वाहतूक थांबे काढली जाणार

तहसील कार्यालयासमोर अनधिकृतरीत्या अनेक वाहते थांबतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यास सदरील थांबे रद्द करण्यासाठी आणि काढण्यासंदर्भात सूचना केली आहे.

-प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार

ही समस्या विद्युत खांबामुळे

अंबाजोगाई रोडवरील ग्रामीण रुग्णालयसमोर एक विद्युत खांब असून, त्यावरून वीज प्रवाह चालू आहे. यासंबंधी महामार्ग प्राधिकरणाला वेळोवेळी सांगूनही तो काढला जात नाही. त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे. याबाबत कार्यालय स्तरावरून पत्र दिले असून, लवकरच कारवाई करण्यात येईल.

-सुनील बिर्ला, पोलीस निरीक्षक