लातुरात रंगल्या पोलिस क्रीडा स्पर्धा ! पोलिसदलाच्या सहा उपविभागातील खेळाडूंचा सहभाग
By राजकुमार जोंधळे | Updated: August 18, 2023 14:25 IST2023-08-18T14:25:00+5:302023-08-18T14:25:18+5:30
लातूर जिल्ह्यातील सहा उपविभागातील पोलिस खेळाडू सहभागी झाले असून, कबड्डी, फुटबाॅल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल हॉकीसह ऍथलेटिक्स खेळांचा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.

लातुरात रंगल्या पोलिस क्रीडा स्पर्धा ! पोलिसदलाच्या सहा उपविभागातील खेळाडूंचा सहभाग
लातूर : जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालय मैदानावर २७ व्या लातूर जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेला शुक्रवारी १० वाजता प्रारंभ झाला आहे. उद्घघाटन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते मशाल पेटवून झाले.
लातूर जिल्ह्यातील सहा उपविभागातील पोलिस खेळाडू सहभागी झाले असून, कबड्डी, फुटबाॅल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल हॉकीसह ऍथलेटिक्स खेळांचा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. उद्घघाटनप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित होते. दैनंदिन धावपळीतून पोलिसांना थोडासा विरंगुळा मिळावा, नेहमीचे कर्तव्य करताना निर्माण होणारा ताण-तणाव कमी होण्यासाठी, मनोरंजनासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने २७ व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला.
लातूर जिल्ह्यातील विविध शाखा आणि पोलिस ठाण्याला कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी, अमलदारांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. क्रीडा स्पर्धातील विजयी खेळाडूंना १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.