शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांचा पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 18:56 IST

गुन्हा दाखल : दर्जी बोरगाव शिवारात घडली घटना

रेणापूर (जि. लातूर) : ‘तू आमच्या वाळुच्या गाड्या पकडण्यासाठी, महसुलच्या लोकांना मदत करण्यासाठी आला होतास का’ असे विचारत पेट्रोलिंग करून रेणापूरकडे परतणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर दर्जी बोरगाव शिवारात प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सोमवारी सकाळी रेणापूर पोलीस ठाण्यात वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 गुन्ह्याच्या तपासासाठी त्याचबरोबर पेट्रोलिंग करून रेणापूरकडे येणारे रेणापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी संतोष गायकवाड यांना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दर्जी बोरगाव शिवारात वाळूमाफियांनी वाटेत अडविले. ‘तू आमच्या वाळूच्या गाड्या पकडण्यासाठी आला होतास का, शिवाय महसूलच्या लोकांना मदत करण्यासाठी आला होतास का’ अशी विचारणा करीत जबर मारहाण केली. यावेळी त्यांच्या अंगावर जीप घालून जिवे मारण्याच्या प्रयत्न झाला. गायकवाड यांनी आपला जीव वाचविण्यासाठी उडी घेतली. दरम्यान, सांगवीकडे जाणाऱ्या दुचाकीवरील दोन व्यक्तींनी ही घटना पाहिली. त्यांनी पोलीस कर्मचारी यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाळूमाफिया मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी या दोघा व्यक्तींनी सांगवी गावाकडे धाव घेऊन ग्रामस्थांना माहिती सांगितली. दरम्यान, ग्रामस्थ घटनास्थळाकडे येत असल्याचे पाहून वाळूमाफिया जीपसह फरार झाले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले, पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनीही धाव घेतली.

याबाबत पोलीस कर्मचारी संतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात राजाभाऊ सूर्यवंशी, रामभाऊ सूर्यवंशी (रा. आरजखेडा) याच्यासह अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार असून, त्यांच्या अटकेसाठी रेणापूर पोलीस ठाण्याची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी दिली.

टॅग्स :sandवाळूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी