लातूर जिल्ह्यात पाेलिसांकडून नाकाबंदी, काेम्बिंग ऑपरेशन, लाॅजचीही तपासणी, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचा घेतला शाेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 05:30 IST2025-08-24T05:30:30+5:302025-08-24T05:30:41+5:30
Latur News: सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर पाेलिसांनी शनिवारी रात्री लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी केली. शिवाय, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांच्या शाेधासाठी काेम्बिंग ऑपरेशन राबविले.

लातूर जिल्ह्यात पाेलिसांकडून नाकाबंदी, काेम्बिंग ऑपरेशन, लाॅजचीही तपासणी, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचा घेतला शाेध
लातूर - सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर पाेलिसांनी शनिवारी रात्री लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी केली. शिवाय, रेकाॅर्डवरील गुन्हेगारांच्या शाेधासाठी काेम्बिंग ऑपरेशन राबविले. दरम्यान, पाेलिसांनी लातुरातील लाॅजची तपासणी केली असून, नाकाबंदीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर एमआयडीसी पाेलिसांनी जुगारावर छापा मारला. यावेळी २० हजारांची राेकड जप्त केली असून, सहा जुगाऱ्यांविराेधात गुन्हा दाखल केला. तर २०२३ पासून फरार झालेल्या एका आराेपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पाेलिसांनी सांगितले, श्री गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पाेलिस अधीक्षक अमाेल तांबे, अप्पर पाेलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या आदेशानुसार शनिवारी रात्री २३ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत काेम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. लातुरातील एमआयडीसी, शिवाजीनगर, गांधी चाैक, विवेकानंद चाैक आणि लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्याच्या हद्दीत चाैका-चाैकात नाकाबंदी करण्यात आली. यावेळी प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. ज्यांच्याकडे लायसन्स नाही, ट्रीपल सीट आहेत, अशांवर खटले दाखल केले आहे. मद्याच्या नशेत वाहन चालविणारेही काही चालक पाेलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्यावरही पाेलिसांनी कारवाई केली आहे.
लातुरात लाॅज तपासणी; अचानक केली नाकाबंदी...
काेम्बिंग ऑपरेशनदरम्यान लातुरातील लाॅजची पाेलिसांनी तपासणी केली. तर एमआयडीसी पाेलिसांनी एका जुगारावर छापा मारला. यावेळी राेख २० हजार रुपये, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात सहा जुगाऱ्यांविराेधता गुन्हा दाखल केला आहे.
- समाधान चवरे, पाेलिस निरीक्षक, एमआयडीसी ठाणे, लातूर
दाेन वर्षांपासून फरार; पाेलिसांनी केली अटक...
एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या दप्तरी २०२३ मध्ये नाेंद असलेल्या गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात एक आराेपी गुन्हा घडल्यापासून फरार हाेता. दरम्यान, ता पाेलिसांना सतत गुंगारा देत हाेता. काेम्बिंग ऑपरेशन दरम्यान पाेलिसांनी या फरार गुन्हेगाराची माहिती मिळाली. पाेलिसांनी त्याला रात्रीतून उचलले आहे.
उशिरापर्यंत अस्थापना सुरू; मालक, चालकांवर खटले...
लातुरात रात्री उशिरार्यंत आपली दुकाने सुरु ठेवणाऱ्या मालक-चालकांविराेधात पाेलिसांनी खटले दाखल केले आहेत. शिवाय, ट्रीपल सीट फिरणाऱ्या वाहनधारकांवरही कारवाईची बडगा उगारला आहे. मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालविणेही अनेकांना महागात पडले आहे. अशावर पाेलिसांनी खटले दाखल केले आहेत, अशी माहिती गांधी चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक सुनील रेजितवाड म्हणाले.