वाहनासह गुटखा पकडला; एकाच्या मुसक्या आवळल्या, लातूरच्या वलांडी-बाेंबळी मार्गावर सापळा
By राजकुमार जोंधळे | Updated: April 12, 2025 11:49 IST2025-04-12T11:47:42+5:302025-04-12T11:49:01+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वाहनासह गुटखा पकडला; एकाच्या मुसक्या आवळल्या, लातूरच्या वलांडी-बाेंबळी मार्गावर सापळा
राजकुमार जाेंधळे, लातूर : चाेरट्या मार्गाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून वाहन, गुटखा असा ८ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री केली. याबाबत देवणी पाेलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, लातूर शहरासह जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाविराेधात कारवाईचे आदेश पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिले. त्यानुसार स्थागुशाचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाकडून अवैध व्यवसायावर कारवाई केली जात आहे.
दरम्यान, वलांड (ता. देवणी) शिवारातून एका वाहनातून गटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती खबऱ्याने पथकाला दिली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर पथकाने वलांडी ते बाेंबळी मार्गावर गुरुवारी रात्री ८ वाजता सापळा लावला. एक संशयीत कार पाेलिसांनी पकडली. झाडाझडती घेतली असता त्यामध्ये ३ लाख १२ हजारांचा गुटखा आढळून आला. यावेळी एकाला अटक केली आहे. चाैकशी केली असता त्याने बस्वराज विश्वनाथ आग्रे (वय ४४, रा. हालसी, ता. निलंगा) असे नाव सांगितले.
याबाबत देवणी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, नितीन कठारे, राहुल कांबळे यांच्या पथकाने केली आहे.