फरार आरोपीला नऊ वर्षानंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 15:01 IST2018-09-08T14:55:58+5:302018-09-08T15:01:18+5:30
मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणातील फरार आरोपी गेल्या 9 वर्षापासून पोलिसांनी गुंगारा देत होता.

फरार आरोपीला नऊ वर्षानंतर अटक
किल्लारी ( जि. लातूर) - मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणातील फरार आरोपी गेल्या 9 वर्षापासून पोलिसांनी गुंगारा देत होता. किल्लारी पोलिसांना आरोपीलाअटक करण्यात यश आलं आहे.
औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस ठाण्यात 2008 मध्ये एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेपासून आरोपी हा फरार होता. लातुरमध्ये एका गॅरेजवर काम करुन वास्तव्य करत असल्याची माहिती किल्लारी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गॅरेजवर शनिवारी सकाळी छापा मारला. यावेळी आरोपी धर्मेंद्र आनंदा आवचाळे (30) याला कव्हा नाका येथून अटक केली. त्याला औसा येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.