पिके बहरली; मजुरांच्या हाताला मिळाले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:11+5:302021-07-22T04:14:11+5:30

येरोळ : रिमझिम पावसामुळे खरिपातील पिके बहरत असून, तण वाढत असल्याने खुरपणीसाठी मजुरांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी, कोराेनाच्या ...

Pike Bahrali; The work got in the hands of the laborers | पिके बहरली; मजुरांच्या हाताला मिळाले काम

पिके बहरली; मजुरांच्या हाताला मिळाले काम

येरोळ : रिमझिम पावसामुळे खरिपातील पिके बहरत असून, तण वाढत असल्याने खुरपणीसाठी मजुरांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी, कोराेनाच्या काळामध्ये बसून राहिलेल्या मजुराच्या हाताला काम मिळाले आहे. तर काही शेतकरी तणनाशकाची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे.

येरोळ व परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध जमिनीतील ओलीवर खरिप हंगामातील पेरण्या उरकल्या. यावर्षीही काही शेतकऱ्यांना सोयाबीन न उगवल्यामुळे दुबार पेरण्या कराव्या लागल्या. सध्या रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे खरिपातील सोयाबीन बहरात आले आहे. रिमझिम पावसामुळे सोयाबीनच्या पिकात तणाची वाढ होत असून, तण काढण्यासाठी काही शेतकरी तणनाशकाची फवारणी करीत आहेत. तर काही बैलाच्या साह्याने कोळपणी करीत असून, लाॅकडाऊनच्या काळात हाताला कसलेच काम नसल्याने महिला मजुरांना खुरपणीचे काम मिळाले असल्याने शेतशिवारात मजुराचे थवेच्या थवे खुरपणी करीत असल्याचे चित्र आहे.

आंतर मशागतीला आला वेग...

यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रिमझिम पाऊस पडत असल्याने आंतरमशागतीला वेग आला आहे. लाॅकडाऊनमुळे शेतकरी व मजुराच्या हाताला काम नव्हते. सध्या शेतात काम मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: Pike Bahrali; The work got in the hands of the laborers