फिजिकल डिस्टन्स न राखणा-यांवर दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:19 AM2021-04-16T04:19:15+5:302021-04-16T04:19:15+5:30

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत बुधवारी रात्री ८ वा. पासून लॉकडाऊन केले आहे. केवळ अत्यावश्यक ...

Penalties for non-maintenance of physical distance | फिजिकल डिस्टन्स न राखणा-यांवर दंड

फिजिकल डिस्टन्स न राखणा-यांवर दंड

Next

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत बुधवारी रात्री ८ वा. पासून लॉकडाऊन केले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जळकोट पोलीस गुरुवारी सकाळी रस्त्यावर उतरले. महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी नाकाबंदी केली. यावेळी रस्त्यावर ये-जा करणा-या प्रत्येक नागरिकांची व वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी ठिकाणी एक पोलीस अधिकारी, चार कर्मचारी व चार विशेष पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणे, विनामास्क फिरणा-यांवर कारवाई करण्यात आली.

शहरामध्ये विनामास्क आढळून आलेल्या २७ जणांकडून २ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी

९ दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांकडून १ हजार ८०० रुपये दंड

वसूल करण्यात आला. ही कारवाई दररोज करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडरे यांनी सांगितले.

नागरिकांनी विनाकारण फिरु नये...

जळकोट पोलिसांनी गुरुवारी सकाळी नाकाबंदी सुरु केल्याने अनेकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. येथील महात्मा फुले चौकात वाहन तपासणीवेळी पोलीस आणि नागरिकांत खटके उडत होते. १ मेपर्यंत संचारबंदी आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण फिरू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी सांगितले.

Web Title: Penalties for non-maintenance of physical distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.