तंत्रज्ञानातून निर्माण केली शिक्षणाची आवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:23 IST2021-08-23T04:23:11+5:302021-08-23T04:23:11+5:30

लातूर तालुक्यातील माटेफळ येथील शिक्षक उमेश खोसे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मुरूड येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत ...

A passion for learning created by technology | तंत्रज्ञानातून निर्माण केली शिक्षणाची आवड

तंत्रज्ञानातून निर्माण केली शिक्षणाची आवड

लातूर तालुक्यातील माटेफळ येथील शिक्षक उमेश खोसे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मुरूड येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. मंचावर राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. अंकुश नाडे, गंगाधर आरडले, लक्ष्मीकांत तवले, अमर मोरे, कैलास बिडवे, अमर जयदेव मोरे, रामभाऊ अंधारे, नितीन धनवडे, राहुल सांगोळे, सौदागर खोसे, वैभव पाटील कवडे, जिलानी हिप्परगे,हनुमंत माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ.काळे म्हणाले, मराठवाड्याचा एक शिक्षक आपल्या प्रयोगशील उपक्रमाच्या माध्यमातून तांडा,वस्ती व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती तळमळीने काम करू शकतो आणि त्या विद्यार्थ्याच्या मनात शिक्षणाची आवड तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण करू शकतो हे आपल्या कार्यातून उमेश खोसे यांनी दाखवून दिले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार घोषित झालेल्या रामकृष्ण परमहंस विद्यालयाचे माजी प्राचार्य डाॅ.रमेश दापके यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक श्रीहरी बिडवे, सूत्रसंचालन शिवलिंग चौधरी यांनी केले. आभार प्रा.अंकुश नाडे यांनी मानले.

अभ्यासाची आवड निर्माण केली...

पुरस्कारप्राप्त शिक्षक उमेश खोसे म्हणाले, कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑफलाइन ॲप्स तयार करून ज्ञानदानाचे काम केले. त्याच पद्धतीने शिक्षण संस्कार या नावाने सात दिवसाचे शैक्षणिक विचार मंथन घडवून आणले या विचार मंथनामध्ये विद्यार्थी पालक व शिक्षक यांचा समन्वय घडवून आणला व वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाची तथा अभ्यासाची आवड निर्माण केली. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करून शिक्षण दिल्यास यशस्वी होऊ शकते.

Web Title: A passion for learning created by technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.