शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं

By राजकुमार जोंधळे | Updated: May 23, 2025 00:07 IST

Latur crime news: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची सृष्टी लातुरातील एका महाविद्यालयात शिकत होती. आई वडिलांची माफी मागत तिने वसतिगृहातच आयुष्याला पूर्णविराम दिला.

- राजकुमार जोंधळे, लातूर ‘आई-बाबा, मला माफ करा...’, अशी चिठ्ठी लिहून ठेवत लातुरात इयत्ता बारावीत शिकत असलेल्या सृष्टी सुभाष शिंदे (वय १७) या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी ४:३० वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील सृष्टी शिंदे ही लातुरातील दयानंद विज्ञान शाखेत इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती. गुरुवारी (२२ मे) ती ४:३० वाजण्याच्या सुमारास जेवण करून वसतिगृहातील खोलीत आली. 

खोलीत कुणी नसल्याचे पाहून सृष्टीने संपवले आयुष्य

ती खोलीत आली, त्यावेळी खोलीतील इतर मुली बाहेर गेल्या होत्या. त्याचवेळी सृष्टीने गळफास घेत आपले जीवन संपविले. सोबतच्या मुली थोड्या वेळाने खोलीवर आल्या. त्यांनी दार वाजवले, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. 

वाचा >>'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट

मुलींनी याची माहिती वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी कर्मचाऱ्यांनी पाहिले असता सृष्टी शिंदे या विद्यार्थिनीने गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला देण्यात आली. 

पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, स.पो.नि. देवकत्ते, अंमलदार संतोष गोसावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लातुरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.

अभ्यासाच्या ताणतणावातून सृष्टीने घेतला टोकाचा निर्णय...

अभ्यासाच्या ताणतणावातून सृष्टी शिंदे हिने गळफास घेत जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती चिठ्ठीत नमूद केलेल्या मजकुरावरून समोर आली आहे, असे एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे म्हणाले.

सृष्टीने चिठ्ठीमध्ये लिहिले,आई-बाबा, मला माफ करा...

सृष्टी शिंदे हिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘आई-बाबा मला माफ करा, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही,’ असा मजकूर त्यामध्ये लिहिलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तीन दिवसांमध्ये दोघींच्या आत्महत्या

अभ्यासाच्या ताणतणावातून लातुरात गुरुवारी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली; तर मंगळवारी शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहात गायत्री विष्णुकांत इंद्राळे (१७, मंग्याळ ता. मुखेड, जि. नांदेड) या विद्यार्थिनीने ओढणीने गळफास घेतल्याची घटना घडली होती.

टॅग्स :Studentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीLatur policeलातूर पोलीसDeathमृत्यू