रबी ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:14 IST2021-01-01T04:14:22+5:302021-01-01T04:14:22+5:30
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळसह परिसरात परतीच्या पावसाने विहीरी, बोअर व नदी - नाले तुंडूब भरले असून, पाणीपातळीतही वाढ ...

रबी ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळसह परिसरात परतीच्या पावसाने विहीरी, बोअर व नदी - नाले तुंडूब भरले असून, पाणीपातळीतही वाढ झाली आहे. याच पाण्यावर शेतकरी सिंचनद्वारे रब्बी पिकांसह भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. वातावरणातील बदलामुळे शेतकर्यांना नैसर्गीक संकटांनी घेरले आहे. खरिप हंगामात अतीवृष्टीने उडीद, मूग आणि सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. आता उपलब्ध पाण्यावर शेतकरी खरिप हंगामातील नुकसान भरपाई काढण्यासाठी रबीसह भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. मात्र, गत आठवड्यापासून वातावरणातील बदलामुळे दिवसा उन्ह तर रात्री थंडी आणि पहाटे धुके पडत आहेत. याचा परिणाम रबीच्या पिकांवर हाेत आहे. प्रारंभी हरभरा पिकावर मुळकुज रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने हरभर हातचा गेला आहे. आता गव्हावर मर रोगाचा प्रार्दुभाव वाढत आहे. परिणामी, पिक पिवळे पडून सुकत आहेत. तर आता रबी ज्वारीवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यातून शेकडो एकरावरील ज्वारीचे पिक धाेक्यात आले आहे.