माॅर्निंग वाॅकला घराबाहेर पडले अन् चाेरट्याने प्राध्यापिकेची पेंडल पळविले !

By राजकुमार जोंधळे | Published: May 31, 2023 09:18 PM2023-05-31T21:18:11+5:302023-05-31T21:18:50+5:30

राजकुमार जाेंधळे / लातूर : माॅर्निंग वाॅकला घराबाहेर पडलेल्या प्राध्यापिकेच्या गळ्यातील साेनसाखळी चाेरट्यांनी हिसकावत पळ काढल्याची घटना लातूर शहरानजीक ...

Out of the house for a morning walk and the teacher's pendle was stolen away by the boy! | माॅर्निंग वाॅकला घराबाहेर पडले अन् चाेरट्याने प्राध्यापिकेची पेंडल पळविले !

माॅर्निंग वाॅकला घराबाहेर पडले अन् चाेरट्याने प्राध्यापिकेची पेंडल पळविले !

googlenewsNext

राजकुमार जाेंधळे / लातूर : माॅर्निंग वाॅकला घराबाहेर पडलेल्या प्राध्यापिकेच्या गळ्यातील साेनसाखळी चाेरट्यांनी हिसकावत पळ काढल्याची घटना लातूर शहरानजीक असलेल्या पाखरसांगवी मार्गावर गंगानगर येथे बुधवार, ३१ मे राेजी घडली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दाेघा अज्ञातांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी पंचशील केरबा डावकर (वय ४२, रा. गंगानगर, पाखरसांगवी, लातूर) या बुधवारी माॅर्निंग वाॅकसाठी घराबाहेर पडल्या. दरम्यान, पाखरसांगवी परिसरातील रस्त्याच्या कडेने त्या चालत जात असताना, एका फार्महाउसनजीक पाठीमागून काळ्या-पांढऱ्या रंगाच्या स्पाेर्टस् दुचाकीवरून आलेल्या दाेघा अज्ञातांनी फिर्यादीच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची साेनसाखळी (किंमत ५४ हजार रुपये) काही कळायच्या आतच हिसकावत पळ काढला. 

याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गु. नं. ३९४ / २०२३ कलम ३९२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे यांनी दिली. पाेलिस हवालदार बेल्हाळे तपास करत आहेत.

Web Title: Out of the house for a morning walk and the teacher's pendle was stolen away by the boy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.