देशमुख महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST2021-02-11T04:21:05+5:302021-02-11T04:21:05+5:30
नुतन सरपंच व सदस्यांचा लातूरात सत्कार लातूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या वीरशैव लिंगायत समाजातील सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा ...

देशमुख महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन
नुतन सरपंच व सदस्यांचा लातूरात सत्कार
लातूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या वीरशैव लिंगायत समाजातील सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार लिंगायत महासंघाच्या वतीने २८ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याचे लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले. सहभागी होण्याचे आवाहन चंद्रकांत झुंजारे, अमरनाथ मुळे, प्रा.डॉ.राजशेखर पाटील, सुभाष बिरादार, सुभाष शंकरे, सुभाष शेरे, दिलीप रंडाळे, तानाजी डोके, अशोक काडादी, एन.आर.स्वामी, निळकंठ शिवणे, काशीनाथ मोरखंडे यांनी केले आहे.
वैभव वाघमारे यांचा लातुरात सत्कार
लातूर : येथील वैभव वाघमारे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. वसंत उगले, बारिक शेख, प्रा.एम.बी.पठाण, विकास वाघमारे, ॲड.शेख, ॲड. राजकुमार गंडले, पद्माकर वाघमारे, प्रा.संजय वाघमारे, ॲड. मंंजूश्री शिंदे, प्रतिक्षा उगले, अलकनंदा उगले, कमलाकर वाघमारे ॲड. आर.के.चव्हाण आदींची उपस्थिती होती.
रजनी गायकवाड यांचा दयानंद महाविद्यालयात सत्कार
लातूर : दयानंद कला महाविद्यालयातील विद्यार्थीनी रजनी गायकवाड हिने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात बी.ए. पदवी परीक्षेत यश मिळविले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.एस.पी. गायकवाड, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ.रमेश पारवे, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, अधिक्षक नवनाथ भालेराव, प्रा.संजय कुलकर्णी, प्रा.शैलेश सुर्यवंशी, वसिष्ठ कुलकर्णी, कु.अपर्वा कांबळे आदींसह प्राध्यापकांची उपस्थिती होती.