मराठा आरक्षणाला समाजातील नेत्यांचाच विराेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:21+5:302021-06-23T04:14:21+5:30

मराठा आरक्षण आणि राज्यव्यापी गाेलमेज परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, राज्य सरकारने खाेटा अध्यादेश काढून मराठा ...

Opposition of Maratha community leaders | मराठा आरक्षणाला समाजातील नेत्यांचाच विराेध

मराठा आरक्षणाला समाजातील नेत्यांचाच विराेध

मराठा आरक्षण आणि राज्यव्यापी गाेलमेज परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, राज्य सरकारने खाेटा अध्यादेश काढून मराठा समाजाची फसवणूक आणि दिशाभूल केली. २२ सप्टेंबर २०२० राेजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत समाजाच्या विविध मागण्यांवरून जे निर्णय झाले, त्याची याेग्य ती अंमलबजावणी झाली नाही. यासाठी आता २५ जून राेजी मुंबईत पुन्हा राज्यव्यापी मराठा आरक्षण गाेलमेज परिषद हाेत आहे. या परिषदेत विविध १४ विषयांवर चर्चा हाेणार आहे़. या गाेलमेज परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. नरेंद्र पाटील, आ. प्रसाद लाड, आ. रमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकल मराठा समाज क्रांती माेर्चा, राज्यातील ४२ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यातून भविष्यातील आंदाेलनाची दिशा ठरविली जाणार आहे. आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेली चेष्टा आता आम्ही खपवून घेणार नाहीत. समाजातील प्रस्थापित नेत्यांनी घराणेशाही निर्माण केली आहे, असाही आराेप विजयसिंह महाडीक यांनी केला.

यावेळी संभाजी सेनेचे अध्यक्ष सुधाकर माने, मराठा महासंग्रामचे अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी, शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष गणेश पाटील, शिवाजीराव हंबर्डे, गजानन कहाळेकर, धर्मराज पवार, सुधाकर साेनवणे, बबन राजे, याेगेश देशमुख, मदन पाटील, विनायक गायकवाड, दत्ता पाटील खराटे, वैभव घाेरपडे आदींची उपस्थिती हाेती.

Web Title: Opposition of Maratha community leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.