किल्लारी कारखान्याची ऑनलाइन सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:49+5:302021-06-16T04:27:49+5:30
किल्लारी साखर कारखान्याचे औसा, निलंगा, उमरगा या तीन तालुक्यात सभासद आहेत. सन २००७ मध्ये हा कारखाना अवसायनात काढून राज्य ...

किल्लारी कारखान्याची ऑनलाइन सर्वसाधारण सभा
किल्लारी साखर कारखान्याचे औसा, निलंगा, उमरगा या तीन तालुक्यात सभासद आहेत. सन २००७ मध्ये हा कारखाना अवसायनात काढून राज्य शिखर बँकेने कारखाना ताब्यात घेतला होता. दरम्यान, माजी आ. बस्वराज पाटील यांनी हा कारखाना भाडेतत्वावर घेऊन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे बरेच कर्ज फेडले होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कारखान्यावर अवसायक मंडळ नियुक्त करण्यात आले. बँकेचे २.५० कोटीच्या कर्जाची तडजोड करून १ कोटी १५ लाख भरुन कर्जमुक्त केले. कारखानाच्या गुरुवारी विशेष सर्वसाधारण सभा होत होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात कडक निर्बंध आहेत. त्यामुळे या सभेस ऑनलाइन उपस्थित रहावे, असे आवाहन अवसायक मंडळाचे जिल्हा उपनिबंधक एम.जे. जाधव, विजयकुमार सोनवणे, केशव ऊर्फ बाबा पाटील, रमेश हेळंबे, विनोद बाबळसुरे यांच्यासह सदस्यांनी केले आहे.