लातूर-जहिराबाद महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

By संदीप शिंदे | Updated: September 6, 2023 18:12 IST2023-09-06T18:12:34+5:302023-09-06T18:12:57+5:30

याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

One person died in an accident on Latur-Zahirabad highway | लातूर-जहिराबाद महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

लातूर-जहिराबाद महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

केळगाव : लातूर-जहिराबाद महामार्गावर केळगाव पाटीजवळ बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. याबाबत निलंगा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

निलंगा तालुक्यातील लातूर-जहिराबाद महामार्गावरील निटूर येथून निलंगा येथील दत्तनगर मशिदीचे मौलाना इमाम जमील हफीजसाब हे दुचाकी क्रमांक एमएच २४ एव्ही २५८७ वरुन बुधवारी दुपारी निलंगाकडे जात होते. दरम्यान, दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास केळगाव पाटीच्या पुढे अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, केळगाव येथील डोंगर उताराला पूल असून, वळण रस्ताही आहे. मात्र, या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने अपघात होत आहे. या ठिकाणी दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.

Web Title: One person died in an accident on Latur-Zahirabad highway