तलाठ्याला दफ्तर नोंदणीच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST2021-07-26T04:19:36+5:302021-07-26T04:19:36+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील नूतन तलाठी सजाला मंडल अधिकाऱ्यांनी बुधवारी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ...

तलाठ्याला दफ्तर नोंदणीच्या सूचना
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील नूतन तलाठी सजाला मंडल अधिकाऱ्यांनी बुधवारी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी दफ्तर नोंदणीबाबत मार्गदर्शन करुन सूचना केल्या.
तालुक्यातील दैठणा येथे चार महिन्यांपूर्वी नूतन तलाठी सजा कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या तलाठी सजांतर्गत चार गावांचा समावेश आहे. यात शेंद उत्तर, शेंद पश्चिम, शेंद दक्षिण आणि दैठणा ही गावे आहेत. नूतन सजाचे कामकाज कशा पद्धतीने सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी मंडल अधिकारी एस. बी. डोंगरे यांनी बुधवारी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी ऑनलाईन नोंदी कशाप्रकारे केल्या जातात, नोंदणीचे रेकॉर्ड ठेवले जाते का, शेतकऱ्यांच्या विविध कृषीविषयक नोंदी सातबारावर घेताना नियमावलीचे पालन करण्यात येते का, आदीबाबत पाहणी करून घेत तलाठी सदानंद सोमवंशी यांना मार्गदर्शन केले. तसेच दफ्तर नोंदणीबाबत विविध सूचना केल्या.
दरम्यान, खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून पीक पेरा, सातबारा, आठ अ आदी कागदपत्रांचे मंडल अधिकारी डोंगरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी हरिश्चंद्र बिरादार, विनायक बिरादार, कल्याणराव बिरादार, तलाठी सोमवंशी उपस्थित होते.