येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्राथमिक व माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. ते थांबविण्यासाठी शिक्षक व पालकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, शालेय निबंध स्पर्धा अंतर्गत राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाने दोन गोल्ड, दोन सिल्व्हर व दोन ब्राँझ पदके पटकावली असून ही पदके पर्यवेक्षक आर. डी. बिराजदार व शिक्षिका अनुराधा पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. प्रारंभी प्राचार्य केंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा के.ए. जायेभाये, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, मदन धुमाळ, प्रा. बी. बी. खटके, प्रा. बदने, प्रा. डी. डी. मुंडे, प्रा. राजकुमार जाधव, शिवकांत वाडीकर, आर. पी. मुंडे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.