लातूरमधील मुस्लीम वेलफेयर एसोसिएशनने, मंत्री नितेश राणे यांना कुराणचा मराठी अनुवाद पाठवला आहे. मुफ्ती फाजिल यांनी शुक्रवारी माध्यमांसोबत बोलताना यासंदर्भात माहिती दिली. नितेश राणे यांना उद्देशून ते म्हणाले, "एखाद्या व्यक्तीची ओळख आपल्या बोलण्यातून होत असते. नितेश राणे साहेब, आपण कोणत्या कॅटेगिरीचे आहात, आपला काय दर्जा आहे आणि आपण किती शिक्षित आहात, हे आम्हाला समजले आहे. आपल्याला इस्लामचे हे कुराण-ए-पाक वाचायची गरज आहे.
तत्पूर्वी, मुस्लीम बांधवांनी पाच वेळची अजान मराठीतून द्यावी, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले होते. एढेच नाही, तर मदरशांमधून मोफत बंदूक मिळते, असेही राणे म्हणाले होते.
दरम्यान मुफ्ती फाजिल म्हणाले, माझ्या हातात कुरान ए पाक आहे. यात एक आयत आहे की, 'लोकांनो अल्लाहची भीती बाळगा', असे म्हटले आहे. आपण जेव्हा हे वाचाल, समजून घ्या, तेव्हा आपल्याला समजेल. नितिश राणे हे एक नेते म्हणून ओळखले जातात एका चांगल्या सोसायटीत राहतात. मात्र, आपल्या राजकीय फायद्यासाठी एखाद्या धर्माला बदनाम करणे, कुरान-ए-पाक संदर्भात भाष्य करणे, मुस्लीमांच्या दाढी आणि टोपी संदर्भात बोलणे, हे आपल्याला शोभत नाही.
"आपल्याला इस्लामचे हे कुरान-ए-पाक वाचायची गरज आहे. अहमदपूर मुस्लीम वेलफेयरकडून हे कुरान-ए-पाक आपल्याला पाठवले जात आहे. कुणार वाचणारा अशा प्रकारे कधीही भाष्य करणार नाही. कारण कुराण सर्वांना आमंत्रित करते आणि कुरान वाचल्यानंतर, इस्लाम काय आहे, हे त्याला समजते. आपण कधी हे वाचलेच नाही. आपण कधी याचा विचारच केला नाही. अशा प्रकारचे इतरही अनेक लोक आहेत.