Murder of a young man in a knife attack in Latur; two arrested | लातुरात चाकू हल्ल्यात तरुणाचा खून; दोघांना अटक

लातुरात चाकू हल्ल्यात तरुणाचा खून; दोघांना अटक

ठळक मुद्देविक्रम नगरातील घटना 

लातूर : शहरातील विक्रम नगर येथे क्षुल्लक कारणावरुन करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले,  फिर्यादी शिवाजी शाहू कापसे (रा. प्रकाश नगर, लातूर) यांचा मुलगा अशोक कापसे (26) हा विक्रम नगर येथे आपल्या मित्राला घेऊन रविवारी रात्री उशीरा गेला होता. दरम्यान, अजय पिसाळ आणि विजय पिसाळ यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरुन बाचाबाची झाली. दरम्यान, याचे पर्यावसान चाकू हल्ल्यात झाले. यामध्ये अशोक कापसे याचा मृत्यू झाला तर मित्र मोहित हा गंभीर जखमी झाला आहे. सदरची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
 
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघा आरोपीला अटक करण्यात आली आहे. असे पोउपनि. कल्याण नेहरकर करीत आहेत.

Web Title: Murder of a young man in a knife attack in Latur; two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.