नांदेड जिल्ह्यातील तृतीयपंथीयाचा लातुरात खून; आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 17:16 IST2020-12-13T17:13:00+5:302020-12-13T17:16:05+5:30
नांदेड जिल्ह्यातील मुळचा रहिवासी असलेला तृतीयपंथी हा गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात वास्तव्याला हाेता.

नांदेड जिल्ह्यातील तृतीयपंथीयाचा लातुरात खून; आरोपीला अटक
चाकूर तालुक्यातील घटना : आराेपीला तीन दिवसांची काेठडी
लातूर : जिल्ह्यातील ब्रम्हवाडी पाटी (ता. चाकूर) परिसरात नांदेड जिल्ह्यातील तृतीयपंथीयाचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवार, ८ डिसेंबर राेजी घडली हाेती. याप्रकरणी पाेलिसांनी एकाला अटक केली आहे. दरम्यान, त्याला चाकूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, नांदेड जिल्ह्यातील चक्री (ता. हदगाव) येथील मूळचा रहिवासी असलेल्या एका तृतीयपंथीयाचा लातूर जिल्ह्यातील बाेकनगाव तांडा येथील सुनील माेतीराम राठाेड याच्याशी ओळख झाली. मयत तृतीयपंथी आणि अटकेतील सुनील हे दाेघेही चापाेली येथून लातूरच्या दिशेने निघाले हाेते. दरम्यान, दाेघांमध्ये लातूर-नांदेड महामार्गावरील ब्रम्हवाडी पाटी येथे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी सुनील राठाेड याने तृतीयपंथीयाच्या डाेक्यात काठीने मारहाण केली, या मारहाणीत ताे बेशुध्द पडला. त्यास चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. याप्रकरणी चाकूर पाेलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी चाकूर पाेलिसांनी तातडीने तपासाची चक्रे गतीमान करत सुनील माेतीराम राठाेड याला ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता, खुनाचा उलगडा झाला. त्याला चाकूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहे, असे पाेलीस निरीक्षक साेपान सिरसाट म्हणाले.
अन् वादातून झाला खून...
नांदेड जिल्ह्यातील मुळचा रहिवासी असलेला तृतीयपंथी हा गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात वास्तव्याला हाेता. गेल्या काही दिवसापासून अटकेत असलेल्या सुनील राठाेडसाेबत ओळख झाली. या ओळखतूनच त्यांची निकटचे संबंध आले. मंगळवारी चापाेली येथून ते दाेघेही लातूरच्या दिशेने निघाले हाेते. दरम्यान, वाटेतच ब्रम्हवाडी पाटी येथे त्यांच्यात कडाक्याचा वाद झाला. यातूनच सुनील राठाेडने त्याच्या डाेक्यात काठीने वार केला. यामध्येच तृतीयपंथीयाचा मृत्यू झाला.