चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:04+5:302021-06-24T04:15:04+5:30
पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील लामजना येथील एका विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून खून करण्यात आल्याचे पाेलीस तपासात आता उघड ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून
पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील लामजना येथील एका विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून खून करण्यात आल्याचे पाेलीस तपासात आता उघड झाले. प्रारंभी याप्रकरणी किल्लारी पाेलीस ठाण्यात मंगळवार, २२ जून रोजी अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली हाेती. दरम्यान, या घटनेचा तपास पाेलिसांनी अधिक गतीने सुरू केला. काही संशयास्पद बाबी पाेलिसांच्या नजरेला आल्याने, अधिक खाेलात जात तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली. अखेर या घटनेतील आराेपी हा विवाहितेचा पतीच निघाला. याप्रकरणी आरोपी पती उमेश बाबू सरवदे याला किल्लारी पाेलिसांनी ताब्यात घेतले. पाेलिसी खाक्या दाखवताच उमेश सरवदे हा पाेपटासारखा बाेलू लागला. पत्नीचा खून आपणच केल्याचे त्याने कबूल केले. चारित्र्याच्या संशयावरून राहत्या घरातच पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर घराला कुलूप लावून घराबाहेर पडलाे, अशी माहिती आराेपी पतीने दिली आहे. याबाबत मयत विवाहितेचा भाऊ सुरेश नागू कांबळे यांच्या फिर्यादीवरून किल्लारी पाेलीस ठाण्यात कलम ४९८, ३०३, ५०४, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक सुनील गायकवाड करीत आहेत.