एका सीनसाठी मिस्टर परफेक्शनिस्टचे चारदा रिटेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 19:00 IST2018-05-01T19:00:46+5:302018-05-01T19:00:46+5:30

एकाच शॉटमध्ये सीन ओके करण्यात माहीर असलेल्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानवर चारवेळा रिटेक घेण्याची वेळ मंगळवारी येथे आली.

Mr. Perfectionist's Amir Khan retake for a scene | एका सीनसाठी मिस्टर परफेक्शनिस्टचे चारदा रिटेक

एका सीनसाठी मिस्टर परफेक्शनिस्टचे चारदा रिटेक

 - चेतन धनुरे 

लातूर - एकाच शॉटमध्ये सीन ओके करण्यात माहीर असलेल्या मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानवर चारवेळा रिटेक घेण्याची वेळ मंगळवारी येथे आली.
पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमांतर्गत आमिर खान लातूर जिल्ह्यातील हंचनाळ या खेडेगावी छोट्याशा चित्रीकरणासाठी व कामांच्या पाहणीसाठी आला होता. यावेळी गावात घेण्यात आलेल्या शोषखड्डयामुळे विहिरींच्या वाढलेल्या पाण्याविषयी आमिरला एक सीन करायचा होता. यात तो सुरुवातीला एक डायलॉग सांगून विहिरीतील पाणी दाखवणार होता. मात्र, चित्रीकरणाच्या वेळी बघ्यांची चांगलीच गर्दी झाली. त्यांच्या गोंगाटामुळे सीन ओके होत नव्हता. त्यामुळे तीन रिटेक झाले. चौथ्यांदा स्वतः आमिरच डायलॉगमधील काही शब्द विसरला. त्यामुळे चौथा रिटेक झाला. अखेर पाचव्यांदा आमिरने नागरिकांना विनंती केल्यानंतर ते शांत झाले व सीन ओके झाला.

Web Title: Mr. Perfectionist's Amir Khan retake for a scene