लग्नघरावर शोककळा; पत्रिका वाटप करणाऱ्या नवरदेवासह चुलत भावाचा अपघाती मृत्यू

By संदीप शिंदे | Updated: April 10, 2024 14:46 IST2024-04-10T14:45:16+5:302024-04-10T14:46:16+5:30

कार-दुचाकीचा अपघात : उदगीर तालुक्यातील लोहारा येथील घटना

Mourning at the marriage house; Accidental death of cousin along with Navardev who distributed marriage cards | लग्नघरावर शोककळा; पत्रिका वाटप करणाऱ्या नवरदेवासह चुलत भावाचा अपघाती मृत्यू

लग्नघरावर शोककळा; पत्रिका वाटप करणाऱ्या नवरदेवासह चुलत भावाचा अपघाती मृत्यू

उदगीर : स्वत:च्या लग्नपत्रिका नातेवाईकांना देण्यासाठी निघालेल्या नवरेदवासह चुलत भावाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२:२० वाजेच्या सुमारास लोहारा येथील दुध डेअरीसमोर घडली. आकाश धोंडिबा निलेवाड (वय २५), विशाल भिवा निलेवाड (वय २२) असे मयत युवकांची नावे आहेत.

उदगीर तालुक्यातील अनुपवाडी येथील विशाल भिवा निलेवाड यांचे १८ एप्रिल रोजी लग्न होते. त्यामुळे ते आपला चुलत भाऊ आकाश धोंडीबा निलेवाड याच्यासोबत लग्नपत्रिका वाटप करण्यासाठी बुधवारी दुचाकी क्रमांक (एम.एच. २४ बी.क्यू. ५८५३) वर उदगीरहून नळेगाव रोडकडे निघाले होते. त्यांची दुचाकी लोहारा गावाजवळील मराठवाडा दूध संकलन केंद्रासमोर आली असता कार क्रमांक (एम.एच. १२ एन.ई. ९१५३)ने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उदगीरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत. दरम्यान, उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: Mourning at the marriage house; Accidental death of cousin along with Navardev who distributed marriage cards