कमाल झाली राव दहापैकी आठ जणांना बायकाेचा माेबाइल क्रमांकही पाठ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:56+5:302021-07-10T04:14:56+5:30
राजकुमार जाेंधळे / लातूर : एका क्लिकवर जगभरातील माहिती स्मार्ट फाेनच्या स्क्रिनवर झळकत आहे़ यातून माहिती तंत्रज्ञानात क्रांती ...

कमाल झाली राव दहापैकी आठ जणांना बायकाेचा माेबाइल क्रमांकही पाठ नाही
राजकुमार जाेंधळे / लातूर : एका क्लिकवर जगभरातील माहिती स्मार्ट फाेनच्या स्क्रिनवर झळकत आहे़ यातून माहिती तंत्रज्ञानात क्रांती झाली असली तरी, अनेकांच्या डाेक्याला ताप झाला आहे़ यातून माणसांच्या स्मरणशक्तीवर मात्र परिणाम हाेत असल्याचे समाेर आले आहे़ याबाबत रिॲलिटी चेकच्या माध्यमातून काही व्यक्तींशी संपर्क साधला, असता अनेकांना आपल्या पत्नीबराेबरच आई-बाबांचाही माेबाइल क्रमांक आठवत नसल्याचे पुढे आले आहे़ लहान मुलांना मात्र आई-बाबांचा माेबाइल क्रमांक ताेंडपाठ आहे़ तर माेठ्यांची याबाबत पंचाईत झाली आहे़
याबाबत मानसाेपचार तज्ज्ञांशी संवाद साधला असता ते म्हणाले, माहिती-तंत्रज्ञानाच्या भडीमारमुळे माणूस आपल्या रिकाॅल मेमरीचा वापरच करीत नसल्याचे एका संशाेधनात दिसून आले आहे़ यातून स्मरणशक्तीवर परिणाम हाेत असल्याचे समाेर आले आहे़ पूर्वी प्रत्येकांना काही मूलभूत माहिती ताेंडपाठ असायची़ अंकगणितही लाेक ताेंडीच साेडवित असत़ बे एके बे, पावकीची पाढेही ताेंडपाठ हाेती़
मुलांना आठवते, मग माेठ्यांना का नाही?
आता एखादा हिशेब करायचा म्हटलं तर माेबाइलवर कॅल्क्यूलेटरचा वापर करावा लागत आहे़ ताेंडी गणित साेडविण्याची पद्धतच विस्मरणात गेली आहे़ माेबाइलवर प्रत्येक व्यक्ती अवलंबून असल्याने, माेबाइलविना जगणे, कामकाज करणे कठीण झाले आहे़ लहान मुले क्रमांक पाठ करतात़ शाॅर्ट मेमरी लाॅग टर्म मेमरीत परिवर्तित हाेत, नंबर लक्षात राहताे़ माेबाइमुळे माेठी व्यक्ती शाॅर्ट मेमरीचा वावर करू लागला आहे़
डाॅ़ आशिष चेपुरे, लातूर
लाेकमत : लातूर
मला माझ्या साहेबांचा क्रमांक ताेंडपाठ आहे मात्र, बायकाेचा क्रमांक आठवत नाही़
स्मार्ट फाेनमुळे नंबर पाठ करण्याची आता गरजच भासत नाही़ प्रत्येक बाबतीत फाेनवरच अवलंबून रहावे लागत आहे़ परिणामी, नंबर आठवत नाही़
कधी-कधी घाई-गडबडीत माेबाइल फाेन घरीच विसरताे़ अशावेळी घरी काॅल करायचा म्हटलं तर बायकाेचा फाेन क्रमांकच आठवत नाही़ मग घरी परतण्याशिवाय पर्याय नसताे़
माेबाइलची चार्जिंग संपली की, क्रमांक आठवत नाही़ हा अनुभव पदरी असल्याने मी जवळचे, घराचे क्रमांक डायरीत नाेंद करून ठेवले आहेत़ यातून मग संपर्क साधणे सुलभ हाेते़
मी मुलांचा, पत्नीचा माेबाइल क्रमांक जाणीवपूर्वक पाठ केला आहे़ यापूर्वी अनेकदा मलाही क्रमांक आठवत नव्हता़
तरुण आणि वृद्धांचीही परिस्थिती सारखीच
स्मार्टफाेन हाती आल्यानंतर प्रत्येकजण माेबाइलचा माेठ्या प्रमाणावर वापर करू लागला आहे़ यातून प्रत्येकजण माेबाइलवर अवलंबून आहेत़
पूर्वी संगणक हाेता, मात्र स्मार्ट फाेन नव्हता़ अशावेळी कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींचे माेबाइल क्रमांक ताेंडपाठ हाेती़ आता सध्याला आठवत नाहीत़
एखाद्याला काॅल करायचा म्हटलं तर लागलीच माेबाइलमधील मेमरी बाॅक्समध्ये जाऊन क्रमांक शाेधावा लागताे़ शाॅर्ट मेमरीतून रिकाॅल मेमरीवर परिणाम हाेताे़ अशावेळी विस्मरणशक्ती कमी कमी हाेत जाते़
बायकांनाही पतिराजांचा क्रमांक आठवत नाही
दिवसातून किमान तीन ते चार वेळा पतिराजाला फाेन करणाऱ्या पत्नीलाही पतिराजांचा माेबाइल क्रमांक आठवत नाही़ काही महिलांना मात्र, पतीचा क्रमांक ताेंडपाठ असल्याचे समाेर आले आहे़ सतत स्मार्टफाेनचा वापर वाढल्याने स्मरणशक्तीवर परिणाम हाेत असल्याचे दिसून आले आहे़
- एक गृहिणी
मी पतीबराेबरच मुलांचे माेबाइल क्रमांक जाणीवपूर्वक ताेंडपाठ करून ठेवले आहेत़ शिवाय, कॅलेंडरवर लिहून ठेवले आहे़ कारण बाहेर पडलेल्या पतीला, मुलांना दिवसभरात किमान दाेन ते तीनवेळा मला फाेन करावा लागताे़ अचनाक फाेन बंद पडला तर क्रमांक ताेंडपाठ असला तर, संपर्क करणे साेयीचे ठरते़
- एक गृहिणी
मुलांना मात्र आई-बाबांचा क्रमांक ताेंडपाठ
माझी शाळा सुटल्यानंतर बाबांना यायला उशीर झाला तर, मी शिक्षकांच्या माेबाइलवरुन बाबांशी संपर्क करताे़ त्यासाठी मला माझ्या आई-बाबांचा माेबाइल क्रमांक पाठ करावा लागला़ यातून मला घरी संपर्क करण्यासाठी अडचण येत नाही़
- रणवीर
मी माझ्या आई-बाबांबराेबर वर्गशिक्षक आणि शाळेतील माेबाइल क्रमांक ताेंडपाठ करून ठेवला आहे़ अनेकदा शाळेच्या वर्गशिक्षकाशी अभ्यासाबाबत चर्चा करण्यासाठी मी आई किंवा बाबांचा माेबाइल वापरताे़ यासाठी मला हे क्रमांक ताेंडपाठ आहेत़
- राघवेंद्र